आयुष्याच्या वाटेवर
काटे अनेक येतात,
कठीण प्रसंग येता मग
स्वामी मार्ग दाखवितात..
येते हमखास प्रचिती
कळत नाही काही तेव्हा,
लीला असते स्वामींची ही
आशीर्वाद असतो तो तेव्हा..
होतील चुका अनेक
जीवनात पुन्हा पुन्हा,
स्वामी घेतील पदरात
दुःख दूर करतील तेव्हा..
नको राग नको लालसा
स्वामींची होता कृपा,
मन होईल प्रेमळ,निर्मळ
आपोआप आपुले तेव्हा..
काय असेल ती अनुभूती
घ्यावे अनुभव अनेकदा,
अक्कलकोटी दर्शनास येता
भारुन जाईल मन तेव्हा..
नको काही अधिक जीवनी
मागणे हे स्वामी समर्था,
स्मरण राहावे नित्य तुमचे
राहो वरदहस्त सदा तुमचा..
नतमस्तक व्हावे तुमच्या चरणी
निःशब्द डोळ्यांत पाणी येऊ दे तेव्हा,
तुमचेच बोल आहे पाठीशी सदा
स्वामी तुमची आहे सदा अगाध लीला..
||अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज सद्गुरू श्री परब्रह्म स्वामी समर्थ महाराज की जय||
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply