ऑफिसमध्ये बसले होते , नुकतेच प्रमोशन झाले होते , बँकही नवीन होती , तसा स्टाफ ओळखीचा होता . दुपारची वेळ होती लंचची वेळ होती , जेवणाचा डबा उघडणार इतक्यात एक जोडपे घाईघाईने आत आले . चेहऱ्यावरून खानदानी दिसत होते पंजाबी जोडपे होते. त्यांनी हिंदीमधून मला भेटण्याची विनंती केली मी खरे तर त्यांना नाही म्हणणार होते कारण एकत्र जेवणाची वेळ होती आणि मी त्यांना नीट ओळखत नव्हते.
तरीपण मी हिंदीतून म्हणाले बसा. मी पंजाब अँड सिंध बँकेत असल्यामुळे माझ्या हिंदी भाषेवर पंजाबी भाषेचे संस्कार बऱ्यापैकी झाल्यामुळे त्यांना जरा बरे वाटले.
थँक यु म्हणत ते दोघे बसले. आणि त्यांनी मुद्याचेच बोलायला सुरवात केली. ते माझ्यासाठी एका उदघाट्नचे निमंत्रण घेऊन आले होते मी विचार केला माझ्यासाठीच का ? मी त्या जोडप्यातील स्त्री ला विचारले तशी ती हसली. ती म्हणाली मॅडम त्यासाठी तुम्हाला दोन मिनिटे बँकेच्या बाहेर यावे लागेल. मला हे विचित्र वाटले परंतु बँक मॅनेजर म्हटल्यावर पेशन्स ठेवणे गरजेचे असते आपण कामचुकार माणसावर डाफरतो तो वेगळे परंतु इथे नम्र विनंती होती. मी त्य्नाच्याबरोबर बाहेर गेले. बाहेर एक पांढरी मर्सिडीज उभी होती. त्याने मॅडम यहा आईए करत दरवाजा उघडला.
आतमध्ये एक साठ ते पासष्ठ वर्षाची स्त्री होती , बाजूला फोल्डेड व्हील चेअर होती. मी त्या बाईना ओळखले आणि पटकन ती म्हणाली ‘ पहचाना ‘.
मी तिला लगेच ओळखले सुमारे २८ ते ३० वर्षांपूर्वीचा तिचा चेहरा मला आठवला. तिने मला हाक मारली आणि मी तिला. दुसऱ्या बाजूने मी दरवाजा उघडून त्याच्याशी बोलू लागले आणि….जवळजवळ २८ ते ३० वर्षापूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोर उभा र्हाईलं.
होय ती होती ‘ अबानी ‘ तिचे पुढले नाव आठवत नव्हते.
त्यावेळी ती अत्यंत साधी होती, लग्न झालेले होते , तिचा नवरा लवकर गेलेला होता आणि तिचा बँकेत अकॉऊंट होता. ती दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक करत होती. वेळेवर बँकेत येत असे, त्याच्या नवऱ्याचे काही पैसे बँकेत होते ते व्याज घेण्यास किंवा कधीकधी अगदी लहान रक्कम ठेवण्यास येत असे.
एकदा अशाच दुपारी आली असताना ती म्हणाली मी छोटा बिझनेस करू पहाटे मदत मिळेल का ? त्यावेळी मी नवीन होते परंतु तिचा उत्साह पाहून म्हणाले कुठला बिझनेस करशील तर ती पटकन म्हणाली छोटा ढाबा काढेन परंतु त्यावेळी इतके कर्ज देता येत नव्हते कारण तिच्याकडे काहीतरी मालमत्ता असणे आवश्यक होते तरीपण दोन चार दिवसांनी चर्चा करता करता तिने म्हटले मी पापडाचा बिझनेस करते , आता याला कर्ज कसे देणार परंतु त्यावेळी थोडे कर्ज देण्याची तरतूद होती , मी तिला ती रक्कम सांगितली पण ती कमीच होती पण काही निवडक सामानासाठी ठीक होती त्यावेळी तिला मी अत्यंत्य थोडे कर्ज दिले.
त्या बँकेत काही वर्षे होते , ती नियमाने येत हॊती, पैसे देत होती, तिचे हफ्ते फेडून झाले होते. माझी पण ट्रान्स्फर झाली होती. खरे तर मी तिला कधीच विसरले होते बरोबर आहे अनेकजणांना अशी कर्जे आम्ही देत असतो हे तर लहान कर्जं होते लक्षात रहाणे शक्यच नव्हते.
खूप गप्पा मारत होतो आम्ही त्यातून कळले तिच्या मुलाचे चंदीगड मध्ये चार मोठे धाबे आहेत आणि ते इतके सुप्रसिद्ध झाले आहेत. ती मुलाबरोबर काही कारणासाठी मुबंईत आली होती तेव्हा तिला कळले मी या ब्रँचला आहे म्हणून ती खास मला भेटण्यास आली होती आणि मुंबईत तिचा मुलगा मोठा ढाबा उघडत होता त्याचे निमंत्रण द्यायला न विसरता आली होती. खरे तर स्वतःचा ढाबा असणे तिचे स्वप्न होते ते तिच्या मुलांनी पुरे केले होते . जाताना तिने निमंत्रण पत्रिका दिलीच परंतु त्याबरोबर एक सुंदर ओढणीही दिली , तिला माहित होते मी कुणाकडून काही वस्तू घेत नाही ते , ते देताना म्हणाली ती गुरुद्वारामधील आहे.
कोण ती , मी कॊण ….परंतु आपण एखादे छोटे जरी चांगले काम केले , छोटे जरी झाड लावले तर त्याचा वृक्ष कधी होईल हे सांगता येत नाही त्यासाठी छोटी सुरवातही महत्वाची असते.
सतीश चाफेकर
Leave a Reply