अभक्त करितो अभक्ष खान
वाईट मार्गे कथा सांगे
गोड बोलुनी निंदा करिती
गृहिणी चालते भाजके वांगे
तो ठरवितो कधी दान द्याचे
मनुष्य नकळे ते कधी घ्यावयाचे
जो अंतरी रोज पाहूनी जगला
तोच खरा सर्वोत्तम दास झाला….
अर्थ-
अभक्त करितो अभक्ष खान,वाईट मार्गे कथा सांगे, गोड बोलुनी निंदा करिती, गृहिणी चालते भाजके वांगे
(चुकीचा मार्ग कोणता? शाकाहारी न खाणे म्हणजे वाईट कर्म का? आजच्या जगात अध्यात्म हा विषय घेऊन त्यावर विनोदी लिखाण करून त्याचे भांडवल केले जाते तो वाईट मार्ग का? एखाद्याने अपेय पान करून मैफिल गाजवणे वाईट कृत्य ठरते का? हो नक्कीच हे वाईट किंवा चुकीचे आहेच, पण गोड बोलून एखाद्यची निंदा करणाऱ्या किंवा दुसर्याच्या आयुष्यात ढवळा ढवळ करणाऱ्या गृहिणीला कोण माफ करणार? आपली मुलंच आपल्याला विचारत नाहीत तरी शेजारणीला तिच्या मुलांना वळण नाही हो हे सांगणाऱ्या सोज्वळ बाईला शिक्षा कोण करणार? जेवण रुचकर होण्यासाठी पदार्थ योग्य प्रमाणात भाजला गेला पाहिजे अति भाजकेपण तोंडाला चव नाही तर कडवट पणा आणते.)
तो ठरवितो कधी दान द्याचे, मनुष्य नकळे ते कधी घ्यावयाचे, जो अंतरी रोज पाहूनी जगला, तोच खरा सर्वोत्तम दास झाला.
(आपण जे करतो गे योग्य असून, ते का करतो किंवा हेच का करतो याची उत्तरे दुसऱ्याला देण्याची गरज नाही किंवा दुसर्याकोणी त्यावर प्रश्नचिन्ह उठवण्याची गरजही नाही. दुसऱ्याच्या विषयात किंवा कामात नाक खुपसण्या पेक्षा आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही हा विचार व्हायला हवा. आणि हे ज्याला समजले तो सुखी आयुष्य नक्कीच जगू शकतो.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply