कुमार दिघे यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३३ रोजी कराची येथे सीकेपी कुटुंबात झाला .त्यांच्या आधीच्या चार पिढ्या कराची येथे रहात होत्या .फाळणीमुळे कुमार दिघे पुणे येथे आले व मामाच्या आश्रयाने राहू लागले .त्यांनी एस .पी .महाविद्यालयातूनएम .ए .पर्यंत शिक्षण पूर्ण केले .शिक्षण घेत असतानाच कुमार दिघे अभिनयाच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले .ताम्बुस लाल असा गौरवर्ण ,भरपूर उंची ,मजबूत बांधा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक वाटू लागले .शिक्षण पूरे झाल्यानंतर त्यांनी सरकारी कार्यालयात नोकरीस लागले .परंतु त्यांच्यातील कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना .
१९६० च्या दरम्यान आचार्य अत्रे यांच्या ‘मोरुची मावशी ‘ या नाटकाद्वारे त्यांनी मोरुची भूमिका करून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले .पहिल्याच प्रयत्नात त्यांना चांगली लोकप्रियता लाभली .त्यानंतर ‘तुका झालासे कळस ‘या चित्रपटात तुकाराम महाराजांची भूमिका केली .अभिनेत्री सूलोचना या ‘आवडी ‘ च्या भूमिकेत होत्या .व्ही .शांताराम यांच्या “इथे मराठिचिये नगरी ” या चित्रपटात संध्या नायिका तर प्रभाकर पणशिकर खलनायकाच्या भूमिकेत होते .दिवंगत अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्याबरोबर रंगभूमीवरील जोडी प्रेक्षकांना मनापासून पसंत होती .या जोडीने ‘माझी बायको माझी मेव्हणी ,अपराध मीच केला ,लफड़ा सदन ,नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल ,इत्यादी नाटके सूपरहिट ठरली .१९६६ मध्ये हिंदी चित्रपट निर्माते विजय भट यांनी कुमार दिघे (राम ) व बिना रॉय (सीता ) यांना घेऊन हिंदी ‘रामराज्य ‘ चित्रपट बनवला .
लग्नाची बेडी,तुझे आहे तूजपासी,कुंकू जपून ठेव ,वेगळं व्हायचंय मला ,या घर आपलंच आहे .बेबंदशाही ,मानापमान ,एकच प्याला ,जय संतोषी मॉं ,कुर्यात् सदा टिंगलम ,गोरा कुम्भार ,घरगंगेच्या काठी ,झाला महार पंढरीनाथ ,पोरकी ईत्यादि नाटक आणी चित्रपटात त्यांनी कामे केली .
सीमा -रमेश देव ,दाजी भाटवडेकर ,बाबूराव पेंढारकर ,सुर्यकांत ,भावना ,कानन कौशल ,चित्तरंजन कोल्हटकर ,चंद्रकांत गोखले ,श्रीकांत मोघे ,लता अरुण ,नयना आपटे ,रंजना,वत्सला देशमुख ,आशु इत्यादी सहकलाकार यांच्या बरोबर कुमार दिघे यांनी अधिक काम केले .कुमार दिघे यांनी शम्भराहून अधिक व्यवसायिक नाटकांमध्ये विविधरंगी भूमिका केल्या .नायक ,खलनायक ,विनोदी ,चरित्र अभिनेता ,ऐतिहासिक पात्र इत्यादि भूमिका त्यांनी गाजवल्या .कित्येक नाटकांचे एक हजारांहून जास्त प्रयोग झाले आहेत .
‘तुका झालासे कळस ‘ या चित्रपटातील भूमिकेसाठी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर दिघे यांना पुरस्कार मिळाला .मराठी नाट्यक्षेत्रांत कुमार दिघे यांच्या योगदानाच्या मानाने त्यांना फारशी प्रसिद्धी अथवा मानधनही मिळाले नाही .त्यातच १९६० च्या पानशेत च्या धरणफूटीत कुमार दिघे यांचे घरही वाहून गेले व त्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले .
प्रत्येक कर्तुत्ववान पुरुषाच्या पाठीमागे त्याची पत्नी भक्कमपणे उभी असते .कुमार दिघे यांच्या पत्नीने त्यांना सुखात तसेच दुःखात मोलाची साथ दिली .त्यांनी लग्नानंतर घर संसार सांभाळून एम .ए .पर्यंत शिक्षण केले व आपल्या दोन्ही मुलांवर सुसंसंस्कार करून उच्चशिक्षित केले .मोठा मुलगा पी .एच .डी .करून अमेरिकेत स्थाईक आहे तर धाकटा मुलगा अनूदिप महाराष्ट्र शासनाच्या सेवेत डेप्युटी सेक्रेटरी पदावर कार्यरत असून ठाणे येथे रहात आहे .दोन्ही मुलांना वडिलांसारखे आकर्षक व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता असूनही त्यांना चित्रपट अथवा नाट्यक्षेत्राचे आकर्षण वाटले नाही .
श्रीनिवास भालचंद्र दिघे यांचे ३जून २००३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .दिघे यांच्या कार्याची कोणीही फारशी दखल घेतली नाही .परंतु पुढील पिढीला त्यांची माहिती व्हावी यासाठी दिघे कुटुम्बिय आणी सी .के .पी .समाज यांनी दिघे यांचे अल्पचरित्र प्रकाशित करावे ही अपेक्षा .
दिलीप प्रभाकर गडकरी
कर्जत – रायगड
ही सर्व माहिती वाचून खूपच आनंद झाला. अभिनयाचा महामेरू असे मी म्हणेन.आज कार्तिकी एकादशी.यानिमित्त मी व माझ्या पत्नीने आज संतगोरा कुंभार हा चित्रपट फायार टीव्ही व युट्यूब यांच्या माध्यमाने हा चित्रपट पाहिला.तशी अनेक पारायणे झाली आहेत.गोरा कुंभार व्यक्ती कोणी साकारली?मग गुगल वर शोध सुरू झाला.आपल्या पर्यंत पोहचता आले.आनंद वाटला.असो श्री गुरुदेव दत्त.