बॉलिवूडमधील सुंदर, चुलबुली आणि क्युट अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा जन्म दि. ३ मार्च १९८७ मुंबई येथे झाला.
बॉलिवूडमधील व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुपरहिट सिनेमा ‘आशिकी-2’ मुळे श्रद्धाची हटके अशी ओळख निर्माण झाली. अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली श्रद्धा एक उत्कृष्ट गायिकादेखील आहे. श्रद्धाकपूरचे वडील शक्ती कपूर हे बॉलिवूडमधील नावजलेले व्हिलन आहेत. आणि आई शिवांगी कोल्हापुरे या पद्मिनी कोल्हापुरे यांची बहिण आहे.
श्रद्धा कपूरचे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, दिग्दर्शक तेजस्विनी कोल्हापूर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्याशीही नाते आहे. या चौघींची श्रद्धा भाची आहे.
श्रद्धा कपूरला अभिनय क्षेत्रातचे आपली कारर्कीद करायची होती. पदवीधर झाल्यानंतर तिन बोस्टर युनिव्हर्सिटीत अॅडमिशन घेतले. मात्र यादरम्यान, तिला ‘तीन पत्ती’ सिनेमा मिळाल्याने तिने शिक्षण मध्यातच सोडले. ‘तीन पत्ती’मध्ये तिने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन, आर माधवन यांची महत्त्वाची भूमिका होती.
यानंतर ‘लव्ह का दि एंड’ या सिनेमातही तिनं काम केले. मात्र २०१३ मध्ये आलेल्या ‘आशिकी -2’ सिनेमामुळे श्रद्धा कपूर प्रकाशझोतात आली. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.
२०१३ मध्ये एफएचएम इंडियाद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात सर्वात सुंदर १०० महिलांमध्ये श्रद्धा पाचव्या स्थानावर होती. २०१४ मध्ये श्रद्धाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘एक व्हिलन’ सिनेमा केला. या सिनेमानंही बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये आशिकी 2, हैदर, उंगील, एबीसीडी 2, बागी, अ फ्लाइंग जेट, रॉक ऑन 2 आणि ओके जानू या सिनेमांमध्ये काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply