अबोल गोड मिठी तुझी
गुंतते मी पुन्हा पुन्हा,
मन गुंतले मोहक मिठीत
न कळली तुला अंतरी वेदना..
कितीक तोडशी तू मज
कठोर पुरुष हृदय मना,
का स्त्री गुंतते मुग्धशी
फरक स्त्री पुरुष भावनेचा हा..
पडला मोह तुझा तो
स्पर्श तुझा मलमली व्हावा,
ओढ तुझ्या आवेगाची
घे ओढून तू अबोल मना..
किती किती दूर जाता
आठवतो तू कातर क्षणा,
भूल ही की मोह माया अशी
डोळ्यांत लपते अश्रू धारा..
कसली ही शिक्षा अशी मग
व्याकुळ होते तुझ्यात सांग का,
सोडव मज मोहातुन अलवार तू
आरक्त होते तुझ्यात मी एकांता..
गोड गुलाबी भाव मिठी
कुठले बंध तुझ्यात गुंतता,
तोड रे तू मला अलगद अशी
मिटल्या मिठीत तुझ्या आठवणी या..
कुठला दोष असा तो
स्त्री होते वेल्हाळ मना,
पुरुष भाव कठोर तुझा
न कळते माझे मन तुला..
गंध भाव रातराणीचे
दरवळते रात्र मोहरता,
घे टिपून तू अलवार मज
भाव तुझ्यात माझा गुंतला..
कसली ही सल अगतिक
विझते ज्योत तू मज तोडता,
कितीक राग तो अनावर
आठवणीत उरेल मी कधी का ?
लुब्ध भाव आर्त तुझ्यात
न कळते स्त्री मोह भावना,
तोड झटक्यात तू मज असा
जाईल दूर दूर मी एका क्षणा..
दोष लागतो कसला तो
भाव वेडे तुझ्यात गुंतता,
कधी कळेल मन वेल्हाळ माझे
न कळल्या तुला माझ्या भावना..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply