मज अजुन नाही कळले
मी तुझ्यात कसा गुंतलो
ज्या क्षणी तुज पाहिले
मी तुझ्यात हरवुन गेलो
न कधीच व्यक्त जाहलो
तुजला निरखित राहिलो
तुही मनीचे जाणले होते
मी मनांत समजूनी गेलो
घायाळ, होताच कटाक्षी
तव काळजात विरघळलो
जे घडले ते ते घडूनी गेले
स्मृतींना उलगडित राहिलो
रुतला अंतरी तव अबोला
मी मना समजवित राहिलो
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२८
७/९/ २०२२
Leave a Reply