नवीन लेखन...

अभिजात संगीताचा अभयाविष्कार

” सध्या भारतीय संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होताना दिसताहेत, आणि संगीतात नवनिर्मिती करण्यात युवा पीढीचा देखील मोलाचा वाटा आहे; आज आपण बघतो की अनेक तरुण तरुणी पारंपारिक संगीताकडे वळून जागतिक स्तरावर घेऊन जाण्यास उत्सुक आहेत; थोडक्यात काय तर आवड असेल तर सवड मिळते आणि हमखास यशप्राप्त होतं; संगीताची रुची मनापासून जपणार्‍या अभय करंदीकर या तरुणाचा गायन, शास्त्रीय संगीत, वाद्यवादन या विषयाची पकड आणि निपुणता पाहिल्यावर भारतीय संगितावरिल आस्था आणि प्रेम किती बळकट आहे हे कळतं. अभयच्या संगीत व कलामय प्रवासाविषयीचा वेध मराठीसृष्टी.कॉमला दिलेल्या मुलाखतीतून…”

संगीत आणि गायकीची परंपरा अभय करंदीकरच्या घरातच असल्याने एक यशस्वी गायक होण्यासाठी खुप उपयुक्त ठरली; त्याचे आजोबा आणि वडिल दोघेही तबलावादक पण तबलावादनापेक्षाही अभयला गायनाची आवड असल्याने, त्याच्या वडिलांनी हीच आवड ओळखून त्यापध्दतीने मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली; त्यासोबतच ‘ प्राची गांगल ‘ , ‘ मेघना देसाई ‘ , ‘ पंडित.अच्युत ठाकूर ‘ प्रसिध्द संगीत दिग्दर्शक ‘ अनिल मोहिलें ‘ सारख्या नामवंत गायक-संगीतकारांकडून अभय करंदीकर ने संगिताचे शिक्षण घेतले आहे; एक यशस्वी गायक-संगीतकार बनायचे असेल तर त्याविषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे; त्यासाठी सर्वप्रथम शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असायला हवा हे अभयने अचूकपने ओळखलं ; ” प्रथम तर सोप्या पध्दतीने शास्त्रीय संगीताची माहिती करुन घेतलं मग या विषयाची गोडी अधिकच वाढत गेली व पुढे अनेक बारकावे कळत गेल्याचं अभय मुलाखतीत सांगतो “.
अभय करंदीकरने ‘ संगीत विशारद ‘ , ‘ संगीत अलंकार ‘ , ‘ संगीत दिग्दर्शन ‘,’ सुगम संगीता ‘ सोबतच संगीत विषयाची पदव्युत्तर पदवी पर्यंतच शिक्षण प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलं असून संगीत संयोजन आणि ध्वनीमुद्रण यासारख्या तांत्रिक बाजू अगदी उत्तमरित्या समजून घेतलं आहेत; अगदी कमी वयातच संगीतक्षेत्रात विलक्षण प्रभुत्व मिळवल्याने श्रीधर फडके, वैशाली सामंत, अजय-अतुल अश्या नामवंत संगीततुल्यां समवेत अभयला ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ करण्याची संधी मिळाली असून, अनेक संगीतमैफलींमधूनही अभयने सुश्राव्य सादरीकरण केलंय;
संगीत क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग आणि तरुण पिढीला भावेल अश्या संगीताची निर्मिती करण्यावर भर असल्याचं अभय सांगतो; ‘फ्युजन’ या प्रकाराबद्दल तू किती आग्रही आहेस? या प्रश्नावर अभय उत्तरतो की “मला फ्युजन प्रकार नक्की ट्राय करायला आवडेल पण त्याचा पाया शास्त्रीय संगीतच असला पाहिजे , तरच आपलं पारंपारिक संगीत तरुणाईला कळेल व आवडेल आणि प्रभावीपीणे पोहचू शकेल “असा मनोदय त्याचा बोलण्याण्यातनं व्यक्त करतो;याशिवाय शास्त्रीय संगीतावर आधारीत “ रंगीले राग ” हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्र आणि ज्ञानवाणी एफ.एम वर सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
रंगभूमीवर नव्याने दाखल झालेली ‘ संगीत आदिपश्य ‘ , ‘ संगीत कान्होपात्रा ‘ या संगीत नाटकांसाठी गायक म्हणून तर सध्या गाजत असलेल्या संगीत कान्होपात्रा या नाटकात विलासची भूमिका अभय साकारत असून ‘ ही नाटकं माझ्यासाठी बरंच काही शिकून जाणारा अनुभव असल्याचे ‘ तो प्रांजळपणे नमूद करतो; त्याचप्रमाणे संगीतक्षेत्रात विशषत: नाट्य व शास्त्रीयसंगीतात सातत्याने नवनवीन प्रयोग करून एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा मानस तो बोलून दाखवतो.
लहानपणापासून गायन-संगीताच्या विविध स्पर्धांमधून अभय करंदीकरने सहभाग नोंदवला असून त्याला अनेकदा प्रथम पारिरोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवाय ” पंडित भिमसेन जोशी स्कॉलरशिप ” ,” बदलापूर शहरातील सर्वोत्कृष्ट कलाकार “, ” बदलापूर भुषण ” अश्या नामांकीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
गायनाव्यतिरिक्त अभयला कविता व गीत लेखन, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची व तबला वादनाची विशेष आवड असून या कलेतही चमकदार कामगिरी त्याने दाखवली आहे; आज आपल्याकडे संगीतक्षेत्रा विषयी असणार्‍या ज्ञनाचा प्रसार व्हावा व नवोदित गायक-संगीतकार घडावेत या उद्देशाने अनेक विद्यालयामधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, गायकी या विषयांवर विद्याथर्यांना प्रशिक्षण देखील देत आहे, त्यामुळे संगीतच्या प्रसाराची अभयची तळमळ व्यक्त होते. अश्या या गुणी कलाकाराची संगीत कलाकृती चिरंतन ठरतील हे नक्की.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..