नवीन लेखन...

भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’ अचला जोशी

अचला जोशी यांचा जन्म १९ मार्च १९३८ रोजी झाला.

अचला जोशी या वाइन बनविणाऱ्या राज्यातील या पहिल्या महिला उद्योजिका असल्या तरी आजही त्याच उमेद, प्रामाणिक व पारदर्शकपणे मद्याच्या या दुनियेत ‘वाइनलेडी’ म्हणून काम करत आहेत. वाइन म्हणजे दारू नव्हे आणि ही वाइन महिलांनीच प्यायची असे काही नाही, तसेच ती कोणीही सहजरीत्या घरीही बनवू शकतं. वाइनबाबतीत अशी ठळक वाइनशास्त्र सांगणारी आणि वाइन बनविण्याचा हा व्यवसाय ऋतुमानावर अवलंबून असल्याने त्याला जोडधंदा म्हणून आवळ्याचे ‘च्यवनप्राश’ आणि ‘तळोजा क्वील्ट’ या नावाने सुरू केलेल्या व्यवसायाला लंडनच्या बाजारात पोहोचवणाऱ्या श्रीमती अचला फडके-जोशी यांनी पनवेलमधील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे.

अचला जोशी या माहेरच्या अचला फडके.दादर हिंदू कॉलनीतील कॉलनी नर्सिंग होमचे डॉ. जी.एम.फडके हे त्यांचे पिता, तर मूत्रपिंड-तज्ज्ञे डॉ.अजित फडके हे त्यांचे सख्खे भाऊ होत.

त्या वेळच्या मुंबईतील माटुंग्यासारख्या ठिकाणी डॉक्टर फडकेंचे ते प्रशस्त घर म्हणजे साहित्य संघातील दिग्गजांचा हे मुक्त वावराचे ठिकाण. साहित्य व सांस्कृतिक वातावरण अचला यांची जडणघडण झाली असली तरी स्वत:ची हौस पुर्ण करत करत त्यांनी बीए व एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबत शिवणकाम व साहित्यप्रेम हेसुद्धा कायम ठेवले. शिक्षणानंतर काही वर्षांनी १९६० साली टाटा कंपनीमधील एका अभियंत्यांसोबत सुधाकर जोशी यांच्यासोबत विवाह झाला. नवरा आणि कळायला लागलेली दोन मुले जसजशी मोठी झाली त्याच वेळी संसाराच्या पटलावरील गृहिणीचे पात्र सोडून शिक्षणाचा अजूनही काही लाभ घ्यावा अशीही सल मनात कुरकुर करू लागल्याने एका वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून त्यांनी इंडियन काऊंसिलच्या प्रदर्शनात भारताच्या शिष्टमंडळात समन्वयकाची जबाबदारी मिळवली. याच जबाबदारीतील पहिला सोहळा पार पडताना स्वत:च्या कार्यपद्धतीवर अमेरिकन अधिकाऱ्यांचे मन कामातून जिंकणाऱ्या या शिष्टमंडळाला थेट एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीचे निमंत्रण मिळाले. याच पार्टीतील रेडवाइनच्या पहिल्या घोटातील चवीने तिने मायदेशी हीच वाइन बनविण्याची जिद्द उराशी बाळगली आणि अमेरिका वारीहून भारतात परतताना अचला यांनी वाइनइस्ट सोबत घेऊन भारतामध्ये प्रवेश केला. प्रवासादरम्यान वाइन कशी बनवितात, त्याचे फायदे-तोटे याविषयी पुस्तकी ज्ञान घेतल्यानंतर मुंबईतील एका रविवारच्या दुपारी अचला या माहेरी गेल्या असताना डॉक्टर भावाला आलेल्या भेट वस्तू मधील पाच किलो द्राक्षाच्या पेटीवर अचला यांची नजर गेली. द्राक्षपेटीतून पहिले द्राक्ष जिभेवर विरघळल्यानंतर अचला यांना अमेरिकेतील त्या रेडवाइनशी जुळत्या चवीचा अंदाज आला. माहेरवाशीण आई घरची ही द्राक्षपेटी स्वत:च्या घरात त्या घेऊन गेल्यावर त्यांच्या पतीने तेवढय़ाच तडफेने द्राक्षाची वाइन बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. लगेचच मोहम्मद अली रोडवरून सात लिटर काचेचा कार्गो, एअर लॉक अशा सामग्रीची खरेदी करण्यात आली. घरातील या आईच्या वाइन बनविण्याच्या पहिल्यावहिल्या प्रयोगात लहानग्यांनी पाच किलो द्राक्ष धुण्यापासून इतर कामांची मदत केली. बघता बघता जोशींच्या घरातील एका बाजूला द्राक्ष धुऊन त्यामध्ये इस्ट टाकून ते बनविण्याची प्रक्रिया पार पडली. तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच १९७० सालच्या सप्टेंबर महिन्यातील सुटीच्या दिवशी अचला यांचा भाऊ व पती सुधाकर यांच्या उपस्थितीमध्ये वाइन झाली का याची उत्सुकता म्हणून हा कार्गो उघडून पाहण्यात आला. ५ किलो द्राक्षाची त्या वेळी सुमारे ४ ते साडेचार लिटर वाइन जोशींच्या घरातील एका कोपऱ्यातील कार्गोमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. चव घेण्यासाठी त्या वेळी अचला यांचा भाऊ यांनी पुढाकार घेतला. पहिल्यावहिल्या घरातील वाइनचा हा प्रयोग अगदी छान पद्धतीने यशस्वी पार पडल्याचे पहिले रिमार्क अचलाबाईंना त्यांच्या घरातून मिळाले. त्यानंतर अचलाबाईंचा हा प्रवास सुरूच राहिला. लिकर बनविणारे पाच हजार लिटर क्षमतेपेक्षा मोठे कारखाने मुंबईबाहेर ठेवण्याच्या नियमातून अचलाबाईंच्या प्रवासाची वाट तळोजा औद्योगिक क्षेत्राकडे १९७९ साली वळली. आजही अचलाबाई इन व्हॉगेस क्रिएशन या कंपनीच्या माध्यमातून प्रिन्सेस ही रेड, व्हाइट, पोर्ट व हनी वाइन बनवितात. सुमारे दीड लाख लिटर वाइनची उत्पादन काढताना एका बॅचमध्ये साचून ठेवलेले द्राक्षाचे अर्क गाळून वाइन तयार केली जाते.

घराच्या एका कोपऱ्यात स्वत:च्या कुटुंबासाठी बनविलेल्या वाइनला आज देशभरात मोठी मागणी होत आहे. १९७३ ते २०१६ या काळात आंध्र प्रदेश, केरळ सहित सैनिक कॅन्टिनमध्ये अचला जोशींची प्रिन्सेस रेडपोर्ट वाइन ठेवली जाते.
ऋतुवारीवर विसंबणाऱ्या वाइनच्या या व्यवसायामुळे कामगारांवर गदा न येण्यासाठी त्यांनी तळोजा क्वील्ट या नावाने मिलमधून विकत आणलेल्या संपूर्ण कॉटनच्या कपडय़ाच्या साह्य़ाने आणि विविध रंगसंगतीचा आधार घेऊन ऊबदार गोधडय़ा शिवल्या जातात. अमेरिकेसह लंडनमध्ये मोठय़ा कंपन्या गोधडय़ांचे प्रदर्शन मांडतात.

१९८३ साली अचला जोशी यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजकतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अचला जोशी या ‘द फर्स्ट वाईन लेडी’ सोबतच लेखिका असून An Amazing Grace, आश्रम नावाचे घर, हरी नारायण आपटे (चरित्र), ज्ञानतपस्वी रुद्र (न.र. फाटक यांचे चरित्र), चंद्रमे जे अलांछन : अचला जोशी यांचे बंधू डॉ.अजित फडके यांचे चरित्र अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

नोव्हेंबर २०१३ मध्ये सावंतवाडी येथे झालेल्या कोमसापच्या ४ थ्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अचला जोशी होत्या..

अचला जोशी या मुंबईच्या माटुंग्यामधील श्रद्धानंद आश्रमाच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. या महिलाश्रमाशी त्या चार दशकांहून अधिक काळ जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी या आश्रमातील महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी रजया, मसाले बनवून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ शोधली. तसेच त्या दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी आहेत.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’ अचला जोशी

  1. I liked write up on hon mrs achala joshi(phadke).. She is icon for lady entrepreneur’s of India-sunil katariya pune 9112112789-ratna katariya 9371025952

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..