नवीन लेखन...

आचमन का करायचे?

माझे  ‘हे आम्ही का करायचे ?’  हे पुस्तक २००२ साली प्रकाशित झाले. त्यातील माहिती खाली देत आहे.

समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते  ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर  लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी  नव्हते. त्यामुळे  शेकडो वर्षे  गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही.   गुरुचरित्र मात्र टिकून आहे. म्हणून मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले . शरीर हलके वाटू लागले. असिडिटी कमी झाली.  नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे  प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, ” बरोबर आहे.”  आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा  अंतराने घेतलेले थोडे  पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.

आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच वापरले. फक्त आम्हाला ते माहीत नाही म्हणून टाकाऊ  म्हणून आम्ही ते सोडून दिले.

अरविंद जोशी
९४२१९४८८९४

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..