अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५० रोजी अंमळनेर येथे झाला.
अच्युत गोडबोले यांनी विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रमुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असताच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्राविण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. त्यांच्यावर लहानपणापासून त्यांच्या श्रीराम पुजारी सरांचा विलक्षण प्रभाव होता.
गंमत म्हणजे ते शाळा-कॉलेजमधले शिक्षक नव्हते; पण आयुष्यात जगावं कसं आणि समृद्ध कसं व्हावं हे गोडबोले त्यांच्याकडून शिकले. मराठी आणि विशेषतः इंग्लिश पुस्तकं, शास्त्रीय गायन, विविध खेळ, कविता, गाणी या साऱ्यांची ओळख पुजारी सरांमुळे झाली आणि गोडबोले यांचं आयुष्यच बदलून गेलं आणि तिथपासून ते चौफेर वाचू, ऐकू लागले. त्याचाच फायदा त्यांना पुढे प्रचंड लेखन करताना झाला.
पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळविली. चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतित केला. आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांसाठी विपुल प्रमाणात लेखन व स्तंभलेखन केले आहे.
अच्युत गोडबोले यांच्याकडे आयटी उद्योगाचा ३५ हून अधिक वर्षाचा अनुभव आहे आणि ते पटनी कॉम्प्युटर सिस्टिम्स, सिंटेल, एलएन्डटी इन्फोटेक, अपार आणि दिशा या कंपन्यांचे व्यवस्थापक राहिलेले आहेत. गोडबोले मराठी व इंग्रजी भाषेतील लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. ते सर्व शैलीतील विपुल लेखनकार आहेत आणि त्यांनी अनेक भाषांतील संकल्पनांचे मराठीत रुपांतर केले आहे.
अच्युत गोडबोले यांचे संगणकावरील ‘संगणकयुग’, संगीतावरील ‘नादवेध’, व्यवस्थापनावरील ‘बोर्डरूम’, विज्ञानावरील ‘किमयागार’, अर्थशास्त्रावरील ‘अर्थात’, गुलामगिरीवरील ‘गुलाम’, नॅनोटेक्नॉलॉजीवरील ‘नॅनोदय’, स्टीव्ह जॉब्ज या तंत्रज्ञाचे आत्मचरित्र ‘स्टीव्ह जॉब्ज’, मानसशास्त्रावरील ‘मनात’, चंगळवादावरील ‘चंगळवादाचे थैमान’, गणितावरील ‘गणिती’ आणि त्यांचे आत्मचरित्र ‘मुसाफिर’ अशी अनेक पुस्तकं गाजली आहेत. अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply