अभिनेता दिलीप जोशी यांचा जन्म २६ मे १९६८ रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतीलच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे जेठालाल गडा. ‘जेठालाल गडा’, ‘दया’ आणि त्यांच्या कुटुंबाभोवतीच या मालिकेचं कथानक फिरतं. १९९७ मध्ये क्या बात है या टी.व्ही. मालिकेतून दिलीप जोशी यांनी करिअरला सुरुवात केली. १९८९ मध्ये मैंने प्यार किया या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीतील करिअरला प्रारंभ केला. त्यानंतर दिलीप यांनी हम आपके है कौन, फिर भी दिल है हिंदुस्तानी, हमराज, दिल है तुम्हारा यांसारख्या १५ सिनेमात काम केले. हम आपके है कौन या चित्रपटात त्यांनी कवी कालिदासाच्या योगदानाचा अभ्यास करणाऱ्या भोला प्रसादची भूमिका साकारली होती. फॅमिली ड्रामा प्रकारातील या चित्रपटामध्ये त्यांच्या विनोदी भूमिकेने अनेकांचीच दाद मिळवली होती. मात्र सिनेमातील त्यांची कारर्कीद म्हणावी तशी यशस्वी ठरली नाही. मग पुन्हा एकदा त्यांनी टी.व्ही. मालिकांमध्ये आपला मोर्चा वळवला. आणि तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून घराघरात पोहचले. या मालिकेसाठी त्यांना १६ पुरस्कार मिळाले आहेत. या मालिकेचे आतापर्यंत २ हजार एपिसोड्स प्रसारित झाले आहेत. मालिकेतील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना आतापर्यंत बांधून ठेवले आहे.
अभिनयासोबतच दिलीप यांना मिमिक्रीही उत्तम करता येते. पण हे यश त्यांना सहज लाभले नाही तर अनेक शोज आणि सिनेमे करुनही दिलीप जोशी यांच्याकडे कोणतेही काम नव्हते. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मिळण्यापूर्वी वर्षभर त्यांच्याकडे कोणतेही काम नव्हते. दिलीप यांच्या पत्नीचे नाव जयमाला असून त्यांना रित्विक आणि नियती ही दोन मुले आहेत. एका मीडिया रिपोर्ट्नुसार, बरीच वर्ष ‘तारक मेहता….’ या मालिकेत ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे दिलीप जोशी जेठालाल या भूमिकेसाठी दिवसाला ५० हजार रुपये घेतात. एक महिन्यात दिलीप सुमारे २५ दिवस शूटिंग करतात. या हिशोबाने त्यांना महिन्याला १२-१३ लाख रुपये मिळतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply