मराठी, हिंदीतील अभिनेते व दिग्दर्शक गजानन जहागीरदार यांचा जन्म २ एप्रिल १९०७ रोजी झाला.
गजानन जहागीरदार यांनी “रामशास्त्री“,“सिंहासन“, “पायाची दासी“,“वसंतसेना“, “वैजयंता“, “उमाजी नाईक“,“सुखाची सावली“, “दोन्ही घरचा पाहुणा” या मराठी चित्रपटातून तर; “होनहार“,“बेगुनाह”,“जेल यात्रा”,“ चरणों की दासी”, “किरण”, “बेहराम खान”, “महात्मा कबीर”, “ट्रॉली ड्रायव्हर”, “बंदर मेरा साथी”,“टॅक्सी स्टॅंड”,“विरहा की रात”,“धन्यवाद” अश्या हिंदी सिनेमांमधून अभिनय व दिग्दर्शन देखील केले होते. तसंच “स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे मा.गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते. गजानन जहागीरदार यांचे १३ ऑगस्ट १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply