मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक उपेन्द्र लिमये यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९६९ रोजी झाला.
महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली. पठडीबाहेरील भूमिका करण्यासाठी उपेंद्र लिमये अतिशय प्रसिद्ध आहेत.
त्यांनी “मुक्ता” या मराठी चित्रपटातून आपली चित्रपट सृष्टितील कारकीर्द सुरु केली. त्यानंतर त्यांनी “बांगरवाडी”, “कथा दोन गणपतरावांची”, “सरकारनामा”, “कैरी”, “ध्यासपर्व”, “चांदनी बार”, “सावरखेड: एक गाव”, “पेज थ्री”, “जत्रा: ह्यालागाड रे त्यालागाड”, “ब्लाइंड गेम”, “शिवा”, “शिवपतीकरम”, “डार्लिंग”, “ट्राफिक सिग्नल”, “प्रणाली”, “उरुस”, “सरकार राज”, “काँट्रॅक्ट”, “मेड इन चायना”, “जोगवा”, “मी सिंधुताई सपकाळ”, “धूसर”, “महागुरू”, “माय नेम इज ३४०”, “धग”, “येलो”, “गुरु पोर्णिमा” आणि “प्यार वाली लव स्टोरी” या हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटात विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या या अभिनय प्रवासात त्यांनी मधुर भंडारकर, रामगोपाल वर्मा, अमोल पालेकर, राजीव पाटिल, जब्बार पटेल, सतीश आळेकर, विनय आपटे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, अनंत महादेवन या प्रथितयश दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे.
त्यांना २००९ साली प्रदर्शित झालेल्या “जोगवा” मधील “तायप्पा”च्या भूमिकेसाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सोबतच त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.upendralimaye.com या त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply