अभिनेते मिलिंद गवळी यांचा जन्म १६ जून १९६६ रोजी मुंबई येथे झाला.
मिलिंद गवळी गेली अनेक वर्षं अभिनयक्षेत्रात आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केलं होतं. पुढे मिलिंद गवळी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील आपले भाग्य आजमावले आहे.
शूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत. मिलिंद आणि अलका कुबल यांनी तर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
त्यांनी हिंदी मालिका क्षेत्रात कॅम्पस या मालिकेतून पदार्पण केले. हिंदीमध्ये त्यांनी कॅम्पस, सीआयडी, आहट, कहानी तेरी मेरी यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.मराठी मालिकातही उल्लेखनीय अशा भूमिका केल्या. प्रत्येक वेळी प्रोजेक्ट कोणताही असो त्यांनी आपली कामे चोख पणे पार पाडली. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मिलिंद यांनी अनिरुद्ध हि ग्रे शेड असणारी व्यक्तिरेखा उत्तमरीतीने वठवली आहे.
मिलिंद गवळी यांची मुलगी मिथिला उत्तम नृत्यांगना असून आणि नृत्य शिकवते सुद्धा. तिचा विवाह २०१८ मध्ये संपन्न झाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply