मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील जातीवंत कलाकार अशी ओळख मिळवलेल्या व मराठी रसिक प्रेक्षकांवर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते निळू फुले यांनी 13 जुलै 2009 म्हणजेच बरोबर दहा
वर्षापूर्वी या जगाचा निरोप घेतला होता. इतक्या वर्षांनंतरही त्यांचा करारी आवाज रसिकांच्या मनात कायम आहे.
आमच्या ठाण्याच्या दीपक बिल्डिंगमध्ये जगन्नाथशेठ खांगटे रहात असत , आता ते हयात नाहीत परंतु त्यांचे कुटूंब रहात आहे, त्यांनी खूप कष्ट केले आणि डॉ.मूस रोड वर ‘ साईकृपा ‘ नावाचे उत्तम उपहारगृह सुरु केले , आजही त्यांची मुले ते संभाळत आहेत. त्यावेळी त्यांनी आणि चंदरशेठ गुप्ता ‘ सवत ‘ नावाचा चित्रपट काढला होता. त्यांच्याकडे निळू फुले येत असत.
एकदा मी आणि माझी आई लिफ्टमध्ये असताना खांगटे काका आणि निळू फुले लिफ्ट मध्ये आले. आधी आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी आईला म्हणालो आई हे निळू फुले…डायरेक्ट आई लिफ्टच्या बाहेर जायला निघाली. मग आम्ही तिला अडवले. इतका निळूभाऊंचा ‘ दरारा ‘ होता पडद्यावर .
पुढे गडकरी रंगायतन मध्ये आले की ते खांगटे काका , मी आणि ते गप्पा मारत असू. त्यावेळी ते मला वाटते कथा अकलेच्या कांद्याची नाटक करत होते, तेव्हा आम्ही एंट्री झाली की बोलत असू कारण त्यांची मुलखात त्यावेळी मी घेत होतो , त्याचप्रमाणे सखाराम बाईंडर तर डोक्यातच घुसले होते. माझ्याकडे खूप छोटा कॅमेरा असे त्याने फोटो काढत असे. आता त्यांनी सही केलेला एक फोट माझ्यालकडे आहे…. खरेच असा माणूस आणि असा अभिनेता होणारे नाही.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply