अभिनेते प्रभाकर मोरे यांचा जन्म १९ जूनला चिपळूण येथे झाला.
चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे.
प्रभाकर मोरे हे मराठीमधील एक ज्येष्ठ अभिनेते आहेत ज्यांनी मराठी नाटक चित्रपट या सारख्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या मराठी नाटकांमध्ये कॉमेडी व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. प्रभाकर मोरे यांनी आपले शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व आपले महाविद्यालयीन चे शिक्षण डीबीजे कॉलेज चिपळूण येथून पूर्ण केलेले आहे.
प्रभाकर मोरे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकं पासून केली आहे. लेखक संतोष पवार यांच्या नाटकांमध्ये अभिनेता प्रभाकर मोरे यांनी भूमिका केलेल्या आहेत. त्यांनी प्रसाद खांडेकर लिखित नाटकांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. प्रसाद खांडेकर आणि प्रभाकर मोरे यांची मैत्री ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ च्या आधीपासून आहे. प्रसाद खांडेकर यांच्या लिखित नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.
२०१२ मध्ये त्यांनी ‘कुटुंब’ या मराठी चित्रपटामध्ये अभिनय केला होता. पुढे २०१५ मध्ये त्यांना “बाई ग बाई” या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली, आणि याच वर्षी त्यांचा ‘कट्टी बट्टी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.
२०१८ मध्ये त्यांनी कॉमेडी चित्रपट ‘बरायान’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
त्यांनी महेश मांजरेकर दिग्दर्शित “भाई व्यक्ती की वल्ली” या चित्रपटांमध्ये पण अभिनय केला होता.
त्यांनी सोनी मराठी या वाहिनीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये भाग घेतला होता.सध्या प्रभाकर मोरे हे सोनी मराठी या वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मराठी रियालिटी शोमध्ये आपल्याला कॉमेडी करताना दिसत आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply