नवीन लेखन...

अभिनेते प्रतिक गांधी

अभिनेते प्रतिक गांधी यांचा जन्म २९ एप्रिल १९८० रोजी सुरत, गुजरात येथे झाला.

मूळचे सूरत असलेले प्रतिक इंजिनिअर आहेत.सुरवातीला सेल्सपर्सन म्हणूनही त्याने काम सुरु केले आणि सोबत सोबत नाटक, लाईव्ह शो करू लागला. २०१६ मध्ये इंजिनीअरिंगची नोकरी सोडून ते पूर्णवेळ ॲ‍क्टिंग करू लागले. राँग साइड राजू, व्हेंटिलेटर, मित्रों , लवयात्री या चित्रपटांमध्ये त्याला भूमिका मिळाल्या आणि या प्रत्येक संधीचे त्याने सोने केले.मोहन नो मसालो, हू चंद्रकांत बक्षी यांसारख्या नाटकांमध्ये प्रतिक यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.

प्रतीक गांधी यांनी गुजराती रंगभूमीवर अनेक नाटकं करून हिंदी चित्रपट व वेबसीरिज मध्ये पाऊल ठेवले. प्रतिक यांनी २००४ मध्ये गुजराती नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘युअर्स इमोशनली’या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. गुजराती रंगभूमी गाजवणा-या प्रतिक यांनी २०१४ मध्ये ‘बे यार’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या आणि सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये प्रतीक गांधी यांनी हर्षद मेहताची मुख्य भूमिका साकारली आहे.

अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा ‘फुले’ या चित्रपटात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या भूमिका साकारणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा बायोपिक असून अनंत महादेवन यांनी या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. राज किशोर खावरे, प्रणय चोक्शी, सौरभ वर्मा, उत्पल आचार्य, अनुया कुडेचा आणि रितेश कुडेचा निर्मित ‘फुले’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रतीक यांनी पत्नीदेखील अभिनेत्री असून तिचे नाव भामीनी ओझा गांधी आहे. तिने साराभाई व्हर्सेस साराभाई, खिचडी, ना बोले तुमने मैंने कुछ कहाँ, एक पॅकेट उम्मीद यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला २०१२-१३ मध्ये ब्रेन ट्युमर झाला होता. पण तिने या आजारावर मात केली. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव मीराया आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..