अभिनेता शंतनू मोघे यांचा जन्म २८ जुलैला झाला.
तरुण आणि दमदार कलाकारांच्या यादीत अभिनेता शंतनू मोघे यांचं नाव आग्रहाने घेता येईल.
शंतनू मोघे हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव होत. शंतनु महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईतून पुण्यात आले. त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. सिंहगड कॉलेजमध्ये शिकत असताना तिथल्या कला गृप मध्ये सामील झाले. मग पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, कॉलेज फेस्टिवल आदी मध्ये सहभागी झाले. अभिनयाची आवड लहानपणापासून होती. श्रीकांत मोघे हे मोठे अभिनेते म्हणून घराघरांत पोहोचलेलं एक व्यक्तिमत्व होते कायम त्यांना काम करताना बघत मोठे झाले. तर काका सुधीर मोघे हे मनामनांत पोहोचलेले मोठे कवी. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. पण काही दिवस चांगलं काम काही मिळत नव्हतं. नंतर मग दोन वर्ष नोकरी करत ऑडिशन देत गेले. मग हळूहळू चांगल्या संधी मिळू लागल्या आणि ह्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम सुरू केले. या सुखांनो या ही त्यांची पहिली व्यावसायिक सीरियल होती. पुढे शंतनू यांनी अनेक मराठी नाटकात आणि चित्रपटात अभिनय केले आहेत.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूपच गाजली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर अभिनेता शंतनू मोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चरित्र भूमिका साकारताना दिसले होते. विप्र एंटरटेनमेंट आणि दिशादिपा फिल्म्स निर्मित ‘श्री राम समर्थ’ सिनेमात शंतनू मोघे यांनी समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसले. आता शंतनू मोघे पुन्हा एकदा मालिकाविश्वात दिसत आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अविनाश देशमुख म्हणून त्यांचा प्रवेश झाला आहे.
शंतनू यांना चरीत्रपटापेक्षा वेब सिरीजमध्ये काम करण्यास आवडते. शंतनु यांनी ‘झी ५’ वरील ‘पॉयझन’ या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. २०१२ मध्ये शंतनू मोघे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे सोबत लग्न केले आहे.दोघेही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असून आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने नाटक, मालिक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांद्वारे प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेत तिने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबागण ही ऐतिहासिक भूमिका साकारली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply