नवीन लेखन...

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर

अभिनेता

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा जन्म १४ जून १९९१ रोजी झाला.

रंगभूमी, चित्रपट आणि टीव्हीवर लीलया वावरणारा आजच्या घडीचा हरहुन्नरी अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरकडे पाहिले जाते. सिद्धार्थ मूळचा पुण्याचा. पुण्यातील एस. डी. कटारिया शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर तो कलाक्षेत्राकडे वळला.

‘हमने जिना सीख लिया ‘या हिंदी चित्रपटाद्वारे २००७ मध्ये सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांसमोर आला. २०१० मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या “झेंडा” या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिले पाऊल टाकले. ‘क्लासमेट ‘ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,ऑनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सिद्धार्थ चांदेकरने २००८ मध्ये ‘अग्निहोत्र ‘या मालिकेत ‘नील’ची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याशिवाय तो कशाला उद्याची बात, मधू इथे आणि चंद्र तिथे, प्रेम हे या मालिकां मध्येही झळकला.‘बालगंधर्व’, ‘सतरंगी रे’, ‘बसस्टॉप’, ‘संशयकल्लोळ’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘वजनदार’, ‘ऑनलाइन बिनलाइन’. ‘गुलाबजाम’ चित्रपटामधील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. सिद्धार्थ चांदेकरने ‘मनातल्या मनात’ व ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरीजमध्ये अभिनय केला आहे.

सिद्धार्थ चांदेकरच्या आईचे नाव सीमा चांदेकर असून त्या मराठी चित्रपट, रंगभूमीवरील अभिनेत्री आहेत. अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्या तेजस्विनी पंडीत आणि आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेल्या १०० डेज या मालिकेत झळकल्या होत्या. या मालिकेत सीमा यांनी आदिनाथच्या आईची भूमिका वठवली होती. काही दिवसांपूर्वीच सीमा चांदेकर यांचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणेतर्फे रंगभूमीवरील लक्षवेधी अभिनेत्रीचा यशवंत दत्ता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

सिद्धार्थचे आईवडील त्याच्या बालपणीच विभक्त झाले. त्यामुळे आईनेच त्याला लहानाचे मोठे केले. सिद्धार्थ त्याच्या नावापुढे आईचे नाव लावतो. उर्फी या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मिताली मयेकरसोबत सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये आहे. याचवर्षी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मिताली आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचे नुकतेच लग्न झाले आहे.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..