विघ्नेश जोशी हे नाव नाटक-मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील सतीश दुसाने या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांना ठाऊक आहे. कलर्स वरील तुझ्या वाचून करमेना या सिरीयल मध्ये त्यांनी काम केले आहे.
मुख्यत्वे साहाय्यक भूमिकांमधून त्याच्या अभिनयाची झलक, प्रसन्नपणा याची ओळख प्रेक्षकांना असते. अभिनयाबरोबरच निरनिराळ्या कार्यक्रमांची संकल्पना ठरविणे, आखणी करून कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये कार्यरत विघ्नेश उत्तम हार्मोनियम वादन करतात.
मालिकांमधील छोटय़ा छोटय़ा भूमिकांबरोबरच ‘वाऱ्यावरची वरात’, ‘कॅरी ऑन काका’ यांसारख्या नाटकांमधून तो महत्त्वाच्या भूमिका केली आहे.
त्यांचा मानवंदना हा” राम गणेश गडकरी , कुसुमाग्रज , विद्याधर गोखले, अत्रे, पुलं यांच्या सारख्यांच्या साहित्य नाट्य संगीत काव्य आणि आठवणी यावर आधारित एक दर्जेदार कार्यक्रम आहे. ‘हसत खेळत’ हा कवितांवर आधारित वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम विघ्नेश, त्याची पत्नी, मुलगा तसेच विजय गोखले, प्रदीप पटवर्धन यांच्या साथीने ते सादर करतात. ‘आनंदयात्रा कवितेची’ या कार्यक्रमाद्वारे लोकांपर्यंत महत्त्वाच्या कवींच्या कविता पोहोचविण्याचे काम विघ्नेश जोशी यांनी केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply