इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा यांचा जन्म दि. १ मार्च १९९१ रोजी मुंबई येथे झाला.
क्रिस्टल डिसूझा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याच्या वडिलांचे नाव मर्विन डिसूझा आणि आईचे नाव स्लीविया डिसूझा आहे. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमधून पूर्ण केले आणि त्यानंतर तिने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिला पहिला ब्रेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून मिळाला होता. तिची ‘कहे ना कहे’ ही पहिली मालिका होती. त्यानंतर ती क्या दिल में है मध्ये तमन्नाच्या भूमिकेत दिसली. २००८ मध्ये, ती स्टार प्लसच्या कस्तुरीमध्ये नवनीतच्या भूमिकेत आणि किस देश में है मेरा दिलमध्ये वीरा म्हणून दिसली.२०१० मध्ये क्रिस्टल डिसूझा सोनी टीव्हीच्या बात हमारी पक्की है मध्ये ताराच्या भूमिकेत दिसली होती. यासोबतच तिने सोनी टीव्हीच्या आहटमध्येही छोटी भूमिका केली होती आणि त्याच वर्षी तिने यामिनीची भूमिका साकारली होती.
२०११ मध्ये, तिने करण टकर सोबत एक हजारों में मेरी बहना है मध्ये जीविका वढेरा ही भूमिका साकारली होती. डिसेंबर २०१३ मध्ये, तिने सोनी टीव्हीच्या एक नई पेखना मध्ये करण शर्मा विरुद्ध साक्षीची भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये, इस्टर्न आयच्या ५० सर्वात सेक्सी आशियाई महिलांच्या यादीत क्रिस्टल डिसूझा १९ व्या स्थानावर होती.क्रिस्टल पंजाबी सिंगर सुखीसोबक आय नीड या या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. ती मागील वर्षी मालिका ‘बेलन वाली बहू’मध्ये झळकली होती क्रिस्टल डिसूझा काही दिवसांपूर्वी पंजाबी सिंगर सुखीसोबत आय नीड या म्युझिक अल्बम मध्ये झळकली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply