अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा जन्म २९ मे १९८५ रोजी सोलापूर येथे झाला.
मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं.
मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली. याच मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मृण्मयीचे बालपण पुणे येथे गेले. स्वरुप गर्ल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत असतांनाच तिने अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण एस.पी. कॉलेज पुणे येथे पूर्ण झाले. मृण्मयी देशपांडेने हमने जिना सिख लिया… या हिंदी सिनेमातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले. २००८ साली आलेल्या या हिंदी सिनेमात- रीमा लागू, सिद्धार्थ चांदेकर हे मृण्मयीचे मुख्य सहकलाकार होते. त्यानंतर मृण्मयीने मराठी मालिंकामध्ये पदार्पण केले.
अग्निहोत्र तसेच कुंकू या मालिकेत प्रमुख भूमिकेत मृण्मयीने काम केले. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, अनुराग, फर्जंद या चित्रपटातील तिच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांनी कौतुक केले. तसेच एक कप च्या, मोकळा श्वास, संशय कल्लोळ, धाम धूम, आंधळी कोशिंबीर, पुणे व्हाया बिहार, साटं लोटं पण सगळं खोटं, मामाच्या गावाला जाऊया, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, अनुराग, बेभान, फर्जंद आदी चित्रपटात मृण्मयीने अभिनय करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं.
व्यावसायिक आयुष्या सोबतच खासगी आयुष्यातचा तोलही तिने सांभाळला आहे. २०१६ मध्ये व्यावसायिक असलेल्या, स्वप्नील रावशी तिने लग्न केले आहे.
‘अनुराग’ या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयी निर्मिती क्षेत्रात उतरली. स्वतःचे ‘मृण्मयी देशपांडे क्रिएशन्स’ हा बॅनरही तिने लॉन्च केलेले आहे. याच बॅनरखाली तिने ‘अठरावा उंट’ हा चित्रपटही बनवला आहे. मृण्मयीची धाकटी बहीण गौतमी देशपांडेही बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आली आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्ये तिची महत्वाची भूमिका आहे.
मृण्मयी देशपांडे हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply