नवीन लेखन...

अभिनेत्री मुग्धा चिटणीस

‘दृष्ट लागण्या जोगे सारे’ हे गाणं आजही संगीत प्रेमींचं आवडतं गाणं… हे गाणं गुणगुणायला लागलं की, डोळ्या समोर येतात ती ट्रेनमधील ते नवं जोडपं. नव्या संसाराच्या स्वप्न उराशी बाळगून प्रवास करतात. १९८६ प्रदर्शित झालेला सिनेमा आजही जस्साच्या तस्सा आठवणारे अनेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. अजिंक्य देवसोबत असलेल्या या अभिनेत्री नव्या जोडप्यांच उत्तम प्रतिनिधीत्व केलं होतं. ही देखणी अभिनेत्री म्हणजे मुग्धा चिटणीस. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९६५ रोजी झाला.

कमी लोकांना या अभिनेत्रीचं नाव माहीत आहे. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांनी गायलेली या सिनेमातील गाणी आजही लोकांच्या फेव्हरेट प्ले लिस्टमध्ये आपलं स्थान घट्ट करून आहेत. सिनेमांत अजिंक्य देवच्या आईची भूमिका दिवगंत अभिनेत्री रीमा लागू यांनी साकारली होती. सासू आणि सुनेचं नातं साकारणाऱ्या या दोघींनी तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा समोर मांडला होता. महत्त्वाची बाब म्हणजे मुग्धा चिटणीस या अभिनेत्री साकारलेला हा एकमेव सिनेमा.

मुग्धा या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या उत्कृष्ट कथा-कथनकारही होत्या. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले.

मुग्धा चिटणीस यांचे उमेश घोडके यांच्याशी लग्न झाले होते.

१० एप्रिल १९९६ रोजी मुग्धा चिटणीस यांचे कॅन्सरने निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..