अभिनेत्री राजेश्वरी खरातचा जन्म ८ एप्रिल १९९८ रोजी झाला.
राजेश्वरी खरात ही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली. राजेश्वरीचे वडील बँकेत काम करतात. तिने पुण्याच्या जोग एज्युकेशन ट्रस्टमधून शालेय शिक्षण घेतले. बारावी पूर्ण झाल्यानंतर तिने सिंहगड कॉलेज, पुणे येथून बी.कॉम मध्ये पदवी मिळवली. ती मूळची विदर्भातील आहे.
मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या यांच्या गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात.
फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता व त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. राजेश्वरी हिने ९ वी मध्ये असताना या चित्रपटात काम केले.
राजेश्वरीनं आतापर्यंत आयटमगीरी आणि फँड्री या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. “पुणे टू गोवा” चित्रपटातून राजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अमोल भगत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
Leave a Reply