‘उतरन’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेल्या तपस्या अर्थात अभिनेत्री रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसाम येथे झाला.
रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीतली स्टार म्हणून ओळख दिली. या मालिकेनंतर रश्मी अनेक रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.’इश्क का रंग है सफेद’ या मालिकेतही तिनं एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘फिअर फॅक्टर’ यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्येच जास्त दिसू लागली होती. छोट्या पडद्यावर मालिकेपासून करिअरला सुरूवात केलेल्या रश्मीनं बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्येही छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
तिचे खरे नाव शिवानी देसाई. रश्मीने मुंबईच्या नारसी मॉजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून टूर अँड ट्रॅव्हलमध्ये डिप्लोमा केला आहे. रश्मीने एका आसामी चित्रपटातूनच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे, नंतर भोजपुरी सिनेमासृष्टीत बस्तान बसवलं आणि आता हिंदी मालिकांची लोकप्रिय नायिका झाली आहे. तिने गजब भइल रामा, कब होए गौना हमार, नदिया के तीर, गब्बर सिंह, दूल्हा बाबू, बंधन टूटे न आणि पप्पू के प्यार हो गईल यांसारख्या सिनेमात काम केलं.
रश्मी देसाई बिग बॉस 15 मध्ये देखील दिसली होती. तिने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री केली होती. इतकंच नव्हे तर ती टॉप 5 मध्ये पोहोचली होती. रश्मी तिच्या कामामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत रहिली आहे. तिचं खासगी आयुष्यात अनेक चढ- उतारांनी भरलेलं आहे. श्मीनं अभिनेता आणि तिचा सहकलाकार नंदिशशी गाजावाजा न करता लग्न केलं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. रश्मी देसाई गुजराती तर नंदिश पंजाबी आहे. ‘उतरन’ मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाच्या अवघ्या एका वर्षात त्यांच्यात वाद होऊ लागले. चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रश्मी सोशल मीडियाद्वारेही सतत आपल्या चाहत्यांना भेटत असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटोज आणि व्हिडीओज देखील सतत शेअर करत असते. रश्मी आपल्या खाजगी आयुष्यातल्या रिलेशनशिप्समुळेही सतत प्रकाशझोतात असते.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply