अभिनेत्री सई रानडे – साने यांचा जन्म २० जूनला झाला.
लहानपणापासूनच सई ला अभिनयात रस होता. आणि अभिनयात पहिले पाऊल उचलण्यासाठी तिने पुण्याच्या विमलाबाई गरवारे शाळेत शिकत असताना भारत नाट्यम वर्गात प्रवेश केला. ती दहावीत असताना, तिने कलावर्धिनी ग्रुपमध्ये साधना पुरस्कार जिंकला. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात असताना सईने स्टेज मध्ये रस घ्यायला सुरुवात केली. नंतर, तिने पुण्यातील सत्यदेव दुबे यांच्या अभिनय कार्यशाळेत भाग घेतला आणि ‘अटल्ये-माणुस’ या प्रयोगात्मक नाटकातही काम केले.
त्या दिवसांमध्ये सई प्रिंट मीडियासाठी मॉडेलिंग करत असे आणि त्याच वेळी टीव्ही मालिकेत योग्य भूमिका मिळवण्यासाठी ऑडिशन देण्यास सुरवात केली. एके दिवशी तिची निवड ‘वहिनीसाहेब’ या मालिकेतील जानकी किर्लोस्करच्या भूमिकेसाठी झाली. सई १९ वर्षाची असताना ‘वहिनीसाहेब’ सिरीयल मिळाली. तेव्हापासून तिचे पुणे-मुंबई जाणं-येणं सुरू झालं. त्यानंतर लगेचच दोन वर्षात तिचे सलील साने सोबत लग्न झाले.
ई-टीव्हीच्या मराठीच्या ‘कस्तुरी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत ती नंतर दिसली. ‘बंड्या आनी बेबी’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. स्पंदन (२०१२), पकडा पकडी (२०११) आणि लक्ष्मी तुझ्याविना (२०१४) हे तिचे इतर चित्रपट होत. तसेच सई ‘तारा फ्रॉम सातारा’ या हिंदी मालिकेत पण दिसली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply