पन्नासच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शीला रमाणी यांचा जन्म दि. २ मार्च १९३२ रोजी पंजाब मधील सिंध येथे झाला.
शीला रमाणी यांनी देवानंद आणि गुरुदत्त यांच्यासोबत भूमिका केल्या होत्या. शीला रमाणी यांचा पन्नासच्या दशकात “मिस सिमला‘ हा किताब जिंकल्यानंतर १९५२ मध्ये “बदनाम‘ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर टॅक्सी ड्राइव्हर, नौकरी, फंटूश, मीनार व रेल्वे प्लॅटफॉर्म या चित्रपटांत त्यांनी काम केले. मॉं-बेटा या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला. त्यानंतर ६०च्या दशकात पारसी व्यापारी जाल कावसजी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. १९८५ मध्ये जाल कावसजी यांचे निधन झाल्यानंतर त्या मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यातील महू येथेच राहिल्या.
शीला रमाणी यांचे १५ जुलै २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply