अभिनेत्री स्नेहल शिदमचा जन्म १९ जून १९९६ रोजी मुंबईत झाला.
स्नेहलचे काका रंगभूषाकार होते. ते स्नेहलसह इतर भावंडांना नाटकाला घेऊन जात असत तसेच यादरम्यान नाट्यकलाकारांशी भेट देखील घालून देत असे. एवढ्या मोठ्या कलाकारांना अगदी जवळून पाहताना तिला फार अप्रुप वाटायचे. या कलाकारांचे क्षेत्र हे खूपच वेगळे आहे. त्यांना पाहायला गर्दी होताना पाहून स्नेहलला त्याबाबत कौतुक वाटायचे. स्नेहलला मुळात लहानपणापासून स्नेहालाला अभिनय आणि नृत्य या दोन्ही कलांची विशेष आवड होती.
स्नेहलचे शालेय शिक्षण विलेपार्ले महिला संघ श्री माधवराव भागवत हायस्कुल येथे झाले. पुढील शिक्षण कीर्ती कॉलेज,दादर येथून तिने पूर्ण केले. कॉलेजमध्ये असल्यापासून अभिनयाची आवड असणारी स्नेहल एकांकिका आणि नाटकांतून अभिनय करत असे. दरम्यान महाविद्यालयात असताना स्नेहलने अनेक एकांकिकांमध्ये काम केले आणि उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिकही पटकावले. ‘चला हवा येऊ द्या’ साठी तिने सहज ऑडिशन दिली आणि ती हे पर्व जिंकली देखील. त्यानंतर मात्र स्नेहलने मागे वळून पाहिलं नाही.
त्यानंतर ती चला हवा येउ द्या – सेलिब्रिटी पॅटर्न’मध्येदेखील कम्माल करताना दिसली होती. दिग्दर्शक शब्बीर नाईक यांचा ‘स्वीटी सातारकर’ हा स्नेहलच्या अभिनय करिअरमधला पहिला चित्रपट होता. यात तिने अमृता देशमुख व संग्राम समेळ या कलाकारांसह स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर तिने झी मराठी वरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’मध्ये विद्या नामक भूमिका साकारली आहे.
Leave a Reply