सूरय्या! तिचा मी लहानपणी रुस्तम-ए- सोहराब पहिला होता..का कुणास ठाऊक मला ती खूप आवडू लागली…मी तिचा हा चित्रपट खूप वेळा पहिला..एक दिवस मी वानखेडे Stadium ला गेलो असताना मला कळले ती कोपऱ्यावर राहते, सरळ मी तिच्या घरची बेल दाबली, एक बाई आल्या, मी madam ची ऑटोग्राफ मागितली, दोन दिवसांनी बोलावले, मी दोन दिवसांनी परत गेलो, स्वाक्षरी मिळाली पण मॅडम समोर नाही आल्या.
काही वर्षांनी मॅडम वारल्या, मी सरळ Charni Road च्या बड्या कबरस्तान मध्ये गेलो, धर्मेंद्र येऊन गेला होता, संगीतकार रवी आणि निवेदक गोपाळ शर्मा होते, दुसऱ्याच्या खड्ड्यात सुरय्याला दफन करत होते माझ्या हातात माती होती आणि जुन्या प्रेताची हाडे होती, कारण त्याआधी कुणालातरी आधी पुरले होते. माती टाकता टाकता का कुणास ठाऊक खूप वाईट वाटत होते तेव्हा दोन ओळी मनात आल्या…
ना हमने आप को देखा, चाहत अधुरी रह गयी…
सुकून है ईतना की दो हात मिट्टी मेरे हात कीं आपके सिरहाने है…
आजही अनेक वेळा तिथून जाताना लाबून तिची कबरीची जागा दिसते आणि मन हेलावते.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply