नवीन लेखन...

अभिनेत्री ऊर्मिला जगताप

अभिनेत्री ऊर्मिला जगताप यांचा जन्म १९ जूनला झाला.

‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत साकारलेल्या महाराणी सोयराबाईंच्या भूमिकेनं ऊर्मिला जगतापला ओळख मिळवून दिली. पुणे जिल्ह्यातल्या प्रसिद्ध जेजुरीजवळचं तक्रारवाडी हे तिचं गाव. घर शेतकरी, या क्षेत्रात कुणी नसताना इथं येण्याचं धाडस तिनं दाखवलं.

चौथीपर्यंत तिचे शिक्षण तक्रारवाडी झाले,तेथे ती आजी-आजोबांसोबत राहिली. त्यानंतर पाचवीला शिक्षणासाठी ती हडपसरला आली. गावात शिक्षण झाल्यामुळे शहरात आल्यानंतर दहावीपर्यंत दडपणात शिक्षण झाले पण त्यानंतर ते एक स्वतःचा वेगळा आत्मविश्वास समजून थोडफार पुढे शिक्षण चालू ठेवलं. बारावी नंतर पोलिस व्हावे अशी इच्छा तिच्या वडिलांची होती.त्यासाठी ती कराटे, ज्युडो, कनाडी शिकली आणि त्यातही तिला प्राधान्य मिळाले पण त्यानंतर १२ वी असताना मला माझ्या स्वतःच्या आवडी समजू लागल्या कॉलेजमध्ये असताना काही मैत्रिणी ऊर्मिलाला तू मालिकांमध्ये काम का करत नाहीत असा प्रश्न विचारला तेव्हा पहिल्यांदा तिच्या मनात अभिनय करण्याची इच्छा जागृत झाली. पण घरातून या गोष्टीला पाठिबा मिळण शक्य नव्हते. कॉलेजमध्ये असताना ती मैत्रिणीच्या मोबाईलवरून विविष ऑडिशन्सची माहिती घ्यायचे, पण त्याचे पैसे असायचे आणि त्यासाठी पुण्यातून मुंबईला या अस बोलायचे आणि घरी सांगायच काय याचंही टेन्शन, पाहता पाहता ती बारावी 78 टक्क्यांनी पास झाली आणि मुंबईला जाण शक्य व्हावं म्हणून तिने पुण्याच्या मॉडर्न कॉलेजात ॲ‍डमिशन घेतलं, आता १२ वी नंतर सीए व्हावे अशी काळाची इच्छा होती त्यानुसार सीएच्या परिक्षेचे फॉर्म भरले आपले मात्र तेरावीच्या पहिल्याच पेपरला ऊर्मिलाचा अपघात झाला. या अपघातानं तिच्या आत्मविश्वासाला मोठा धक्का बसला. व ऊर्मिलानेठरेपर्यंत छोटी-मोठी मिळेल ती नोकरी करायचे ठरवल आणि तिला एका जवळच्या दवाखान्यात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करू लागली आणि तिने पुन्हा एकदा ऑडिशन बद्दल नेटवर माहिती घेतली आणि प्रविण जगताप या को-ऑर्डिनेटरन जुनियर आर्टिस्ट म्हणून काम करशील कार विचारलं, तिला फक्त एक संधी हवी होती कारण या क्षेत्रातलं ओळखीचं कोण एक नाही. घरदार शेती करून जगण्याचे असल्यामुळे ओळखही नाही. दुस-याच दिवशी कर्जतला मला दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हिंदू सरकार या सिनेमात बिना डॉयलॉग का हा होईना तिला काम करायला मिळाल, व तिथूनच ऊर्मिलाची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सुरू झाल त्यानंतर ऊर्मिलाने अनेक मराठी-हिंदी सिनेमात ज्युनियर म्हणून काम केलं, गावोगावी जावून पथनाट्ये केली. हळूहळू ओळख वाढू लागली आणि नवीन प्रोजेक्टसाठी टोला फोन येवू लागले. अशाच एका ओळखीतून ऊर्मिला प्रेक्षक जल्लोषमध्ये मुलाखतीसाठी गेली आणि प्रेक्षक जल्लोषचे डायरेक्टर रमेश शेट्टी यांनी तिची अँड ॲ‍म्बेसिडर म्हणून निवड केली. प्रेक्षक जल्लोषद्वारे मराठी सिनेमांचे प्रमोशन करण्याची संधी तिला मिळाली. ‘अंधार सावलीचा’, ‘टिपूर’, ‘करवली’, ‘चिर्र बुंगाट’ या शॉर्ट व्हिडिओंतून तिनं सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग निर्माण केला.

मराठी मालिकांमध्ये विविध कामं केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला जगतापने रौद्र सिनेमातून पदार्पण केले. एप्रिलमध्ये रौद्र हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झालं होतं. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजीत ७ व्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये उर्मिलाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..