नवीन लेखन...

अभिनेत्री वैजयंती माला

वैजयंती माला रमन म्हणजेच ‘ वैजयंती माला हिचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी तामिळनाडु येथील त्रिपलिकेन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव एम. डी. रमन होते तर आईचे नाव वसुंधरादेवी होते. त्यांची आई वसुंधरादेवी तामिळ चित्रपटातील अभिनेत्री होत्या. वयाच्या आठव्या वर्षी वैजयंतीमाला यांचा व्हॅटिकाँन सिटी येथे कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांची आई आणि पोप पायस X II प्रेक्षकांत होते. वैजयंतीमाला यांचे शालेय शिक्षण चेन्नईतील चर्च पार्क येथील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्यांनी भरतनाट्यमचे शिक्षण गुरु वजाहूर पिलाई यांच्याकडून घेतले. वयाच्या १३ व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी अरंगनेत्रम शिकायला सुरवात केली आणि पुढे त्यांनी तामिळनाडूत त्याचे कार्यक्रम केले. वैजयंतीमाला यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात तामिळ भाषेतील ” वड़कई ” या चित्रपटापासून केली. त्यांनतर त्यांनी पुढल्याच वर्षी म्हणजे १९५० साली तामिळ चित्रपट ” जीवितम ” मध्ये काम केले. त्याचप्रमाणे त्यांनी तेलगू चित्रपटातदेखील कामे करायला सुरवात केली.

सुरवातीला वैजयंतीमाला यांनी बहार , लडकी , नागीण या चित्रपटातून कामे केली त्यानंतर आलेल्या देवदास मध्ये त्यांनी काम केले. बहार चित्रपट जेव्हा त्यांच्याकडे आला तेव्हा त्यांची आजी खूप नाराज होती कारण तिचे भरतनाट्यमचे शिक्षण कसे होणार , शालेय शिक्षणाचे काय होणार याचा विचार त्यांच्या मनात आला तेंव्हा अनेकांनी तिची समजूत काढल्यावर वैजयंतीमाला यांना चित्रपटात काम करण्याची परवानगी मिळाली. हिंदी चित्रपटात स्वतःचाच आवाज पाहिजे म्हणून त्या हिंदी शिकल्या. त्यानंतर त्यांनी कन्नड चित्रपटातूनदेखील कामे केली. १९५५ मध्ये बिमल रॉय यांनी चित्रपट बनवला ‘ देवदास ‘ त्यात दिलीपकुमार देवदासच्या भूमिकेत होता तर ती ‘ पारो ‘ होती सुचित्रा सेन आणि ‘ चंद्रमुखी झाली होती वैजयंतीमाला. त्यांनतर बी. आर. चोप्रा यांचा ‘ नया दौर ‘ हा चित्रपट त्यांना मिळाला परंतु त्याआधी तिचा तो रोल मधुबाला करणार होती परंतु काही कारणांनी तो रोल वैजयंतीमाला त्यांच्याकडे आला आणि ही त्यांची भूमिका खूपच गाजली. त्यांनतर अमेय चक्रवर्ती यांच्या ‘ कठपुतली ‘ या चित्रपटात त्यांनी काम केले तेव्हा त्या उत्तम विनोदी अभिनय करू शकतात हे कळले. किशोरकुमार आणि वैजयंतीमाला यांनी ‘ आशा ‘ या चित्रपटात खूप धमाल उडवली.

वैजयंतीमाला आणि दिलीपकुमार यांचे जवळजवळ सर्वच चित्रपट हिट गेले. त्या दोघांनी ‘ गंगा-जमना ‘ या चित्रपटात काम केले. त्या चित्रपटात एक दाक्षिणात्य अभिनेत्री उत्तम भोजपुरी भाषा बोलू शकते याचे सर्वाना आश्चर्य वाटले.
मनोजकुमारबरोबर त्यांनी ‘ डॉक्टर विद्या ‘ चित्रपटात काम केले हा चित्रपट चालला. परंतु यानंतर आलेले अनेक चित्रपट चालले नाहीत. परंतु त्यानंतर आलेल्या रजकपूरच्या ‘ संगम ‘ चित्रपटांनी मात्र जबरदस्त यश मिळवले. ‘ संगम ‘ या चित्रपटातील गाणी , कथा, संगीत सर्व काही लोकांना आवडले. हा चित्रपट हिट ठरला. यशाच्या शिखरावर असतानाच वैजयंतीमाला यांचा विवाह डॉक्टर बाली यांच्याशी झाला. १९६० नंतर वैजयंतीमाला तामीळ चित्रपटातून कामे करत असताना हिंदी चित्रपटातून कामे करत होत्या. परंतु हळूहळू १९६३ नंतर तामिळ चित्रपट येण्याचे कमी झाले . आम्रपाली या चित्रपटापासून त्यांना चित्रपटसृष्टीचा कंटाळा येऊ लागला आणि हळूहळू त्या राजकारणात आल्या , त्या संसद सदस्य झाल्या परंतु त्यांनी आपले भरतनाट्यमचे कार्यक्रम मात्र जगभर चालू ठेवले. यश चोप्रा यांनी ‘ दिवार ‘ या चित्रपटासाठी वजयंतीमाला यांना आईच्या रोलसाठी विचारणा केली होती तेव्हा त्या म्हणाल्या मी ‘ नायिका ‘ म्ह्णून चित्रपटसृष्टीत आले होते ‘ नायिका ‘ म्ह्णूनच राहीन. पुढे तो रोल निरुपा रॉय यांनी केला.

वैजयंतीमाला यांची चित्रपट कारकीर्द ही वीस वर्षाची होती. परंतु त्या पहिल्या सुपरस्टार ठरल्या. वैजयंतीमाला याना अनेक पुरस्कार लाभले . चित्रपटासाठीसाठी तर मिळालेच परंतु एक नृत्यांगना म्ह्णून खूप अवॉर्ड्स मिळाले. त्याची यादी खूपच मोठी आहे. त्यांना चार वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले , ब्रिटिश एशियन फिल्म फेस्टिवल मध्ये अवॉर्ड मिळाले. आणि १९९६ मध्ये फिल्मफेअरचे लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळले. १९६८ साली पदमश्री अवॉर्ड भरात सरकारने दिले , रजनीकांत लिजण्ड अवॉर्ड , बी . सरोजा देवी अवॉर्ड असे अनके मानसन्मान त्यांना मिळले. वैजयंतीमाला यांनी तामिळ , कन्नड, हिंदी चित्रपटात कामे केली. त्यांनी जी कामे केली ती प्रमुख भूमिका म्ह्णून केली. दुय्यम भूमिका त्यांनी स्वीकारल्या नाहीत. १९४९ ते १९६९ या वीस वर्षात त्यांनी सुमारे ६० चित्रपटातून भूमिका केल्या. वड़कई, जिविथम , बहार , नागीन , देवदास , न्यू दिल्ली , नया दौर , कठपुतली , आशा , साधना, मधुमती , पैगाम , गंगा जमुना , संगम , लीडर , आम्रपाली , सुरज , ज्वेल थीफ , संघर्ष , साथी आणि प्रिन्स अशा प्रमुख चित्रपटातून त्यांनी कामे केली.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..