आपण विविध प्रकारचे नैवेद्य दाखवतो. त्या विषयावरील खालील लेख खूप वेगळा आहे. तरी लक्षपूर्वक वाचावे ही विनंती.
आधी नैवेद्य मग प्रसाद – काय आहे हे गौडबंगाल?
आज श्री स्वामींच्या कृपाप्रसादाने व आई जगदंबेच्या आशीर्वादाने नैवेद्य व प्रसाद म्हणजे नक्की काय? हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
परमात्म्याची सर्वात परिपूर्ण निर्मिती म्हणजे समस्त मानव. मग मानव जातीने समस्त सृष्टीला सहाय्य करून आपली व पृथ्वीची, निसर्गाची, उन्नती जोपासना करण्यासाठी त्या विधात्याने निर्माण केलेल्या अनेक चांगल्या कर्मापैकी एक सर्वोत्तम कर्म किंवा परमात्म्याला अपेक्षित असलेले एक उत्तम कर्म म्हणजे नैवेद्य व प्रसाद होय. या विधानाने टाकले ना गोंधळात? वाटले ना आश्चर्य ? मग हा लेख नक्कीच वाचा.
आपण नैवेद्य व प्रसाद या दोन भिन्न गोष्टीत गडबड करतो.
देवाला अर्पण करतात तो नैवेद्य आणि त्या परमेश्वराने आपण अर्पणवकेलेल्या नैवेद्यावर कृपा केली की त्या नैवेद्याचे रूपांतर कृपा प्रसादात होते.
म्हणजेच नैवेद्य हा देवासाठी व नैवेद्याचां रूपांतरित भाग म्हणजे प्रसाद. हा आपल्या सगळ्यांसाठी. किती साधी सोप्पी गोष्ट पण आपण गडबड करतो. हो ना?
आता नीट लक्ष देऊन बघा! नैवेद्य म्हणजे काय? खडीसाखर? पेढे? मोदक ? की असेच काही गोड गोड-धोड फक्त भौतिक पदार्थ?
काय तो परमात्मा या असल्या गोष्टी आपल्या कडून अपेक्षित करत असेल? होय अपेक्षित हाच शब्द म्हणतोय मी!
कारण ईश्र्वराने चराचर सृष्टी ची निर्मिती करताना प्रत्येकात आपले स्थान, वास्तव्य ठेवले आहे. आणि मानवाला काही विशेष गोष्टी बहाल केल्या त्यातीलच एक म्हणजे मानवाची बुध्दी. का दिली फक्त मानवा लाच विशेष बुध्दी ?
तर मानव बुद्धीचा योग्य वापर करून संपूर्ण सृष्टी(पृथ्वी/निसर्गाचे) चे नंदनवन म्हणजे स्वर्गात रूपांतर करेल.
कसे?
तर मानव आपल्या चांगल्या कर्माच्या कमाईतून, मग ती कमाई काय फक्त आर्थिक किंवा धन, द्रव्य, धान्य रुपिच नसून, कोणत्याही प्रकारची चांगली कमाई! यात कमाई म्हणजे आपले अनुभव, ज्ञान, कला किंवा कसब हे सर्व अभिप्रेत आहे. तसेच यात श्रद्धा आली, भक्ती आली, प्रेम आल, उपदेश आला, सुख आल, समाधान, शांती आली, जोपासना आली, संगोपन आल, स्नेह आला, आनंद आला, धीर आला या असल्या समृध्द प्रकारच्या कमाईचा काही भाग मानव ईश्र्वराला अर्पण करेल.
काय अभिप्रेत ( अपेक्षित ) आहे त्या परमात्म्याला ? तर चांगल्या कर्माच्या कमाईतून ( ईश्र्वरला अपेक्षित कमाईचा अर्थ वर सांगितला आहे ) मिळालेला काही भाग मानव, मला (परमेश्वराला ) नैवेद्य म्हणून अर्पण करेल!
लक्षात येतय, नैवेद्य म्हणजे काय ते?
मानवाने, आपल्या कमाईचा काही ठराविक एक भाग. वर सांगितल्या प्रमाणे ईश्र्वराच्या साक्षीने म्हणजेच परमेश्वराच्या समोर देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करून, इदम् न मम . या उक्तप्रमाणे इतरांना वाटून टाकणे. यालाच खाऱ्या अर्थाने प्रसाद म्हणतात.
आता आपण आपल्या कर्माच कमाईतून अगदीच नगण्य भाग पेढे बर्फी स्वरूपात(सांकेतिक स्वरूपात) ठेवतो. आणि त्यालाच नैवेद्य म्हणतो.
देवाकडून खूप काही प्रचंड प्रमाणात मागत बसतो! असो.
जसे चांगली कमाई तील भाग नैवेद्य होतो ! तसेच प्रसाद पण कोणाला मिळाला पाहिजे. जो भक्त प्रसन्न होण्यासाठी(ईश्वराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो.) ईश्र्वराला साद घालतो त्याला. आणि त्या भक्ताला मिळतो तो प्रसाद आता भक्त प्रसन्न केव्हा होतो? ( इथे प्रसन्न याचा अर्थ आनंदी, तृप्त, समाधानी, संतुष्ट हा किंवा असा अभिप्रेत आहे ) तर त्याचा चांगल्या ( चांगल्या या शब्दाला महत्व आहे चांगल्या चां अर्थ सत्याची कास धरून असलेल्या ) माफक अपेक्षा हा आहे. पुऱ्या होतात तेव्हा! परमेश्वर चराचर सृष्टीत असला तरी तो निर्गुण निराकार स्वरूपात असतो. कोणाला दिसत नाही की जाणवत नाही. मग तो जो भक्त त्याला साद घालेल त्या भक्ताला अशा स्वरूपात (प्रसाद सिस्टीम ) नी मदत करतो.
म्हणून परमेश्वराने मानवाला ( भक्ताला ) नैवेद्य व प्रसाद या कर्म बंधनात बांधले. आपण म्हणतो ईश्र्वर याच्या स्वरूपातून आला. त्याचा रूपातून आला. म्हणजेच आधी नैवेद्य व नंतर प्रसाद या सिस्टीम ने आला !
उदा. एका शेठ ने पाणपोई दिली ( म्हणजे नैवेद्य म्हणून अर्पण केली ) तर पाणी स्वरूपात त्याचा प्रसाद वाटला जातो.
हे (आधी नैवेद्य मग प्रसाद) देवानेच मानवाला दिलेले देवाच्या अपेक्षेने सर्वोत्तम कर्म आहे. असे मला वाटते.
म्हणजे थोडा अध्यात्मिक विचार केला तर “ज्याच्याकडे जे जे चांगले आहे, ते ते नैवेद्य स्वरूपात समाजाला, सृष्टीला अर्पण करून, ज्याच्याकडे ते नाही, त्याच्याकडे ते प्रसाद स्वरूपात पोहोचविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नैवेद्य होय.”
आणि “ज्याच्याकडे जे जे चांगले नाहीये, ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून कृपा प्रसाद म्हणून पदरात पाडून (पदरात पाडून घेणे चांगल्या अर्थाने म्हणजेच श्रोता वक्ता श्रीराम. देणारा आणि घेणारा एकाच पातळीवर.) घेणे म्हणजे प्रसाद होय.
मग परमात्म्याला अपेक्षित नैवेद्य दाखवायला ठराविक ठिकाणी ठराविक वेळेला आणि ठराविक एकच गोष्टी घेऊन जाण्याची गरज आहे का ?
आणि परमात्म्याला अपेक्षित प्रसाद घेण्यासाठी सुद्धा ठराविक ठिकाणी जाण्याची गरज आहे का ?
अंतर्मुख होऊन वरील विधानांचा अर्थ समजून घेऊया. आता तरी लक्षात येतय का की पेढे, बर्फी किंवा नुसतेच गोड धोड भूत पदार्थ म्हणजे नैवेद्य, प्रसाद नाही.
तरी आजपासून नैवेद्य व प्रसाद या बाबतच्या आपल्या संकल्पना बदलुयात. आणि परमात्म्याच्या अपेक्षे प्रमाणे स्वर्ग निर्माण करूयात.
— © शैलेश महाजन
बदलापूर.
(फ्रीलानसर कंटेंट रायटर )
varadsm@gmail.com
9322755462
Leave a Reply