नवीन लेखन...

आधुनिक काशियात्रा

रोजची पहाट चे संपादक आणि स्वतःस मुलाखत सम्राट म्हणवून घेणारे सूर्याजीराव रविसांडे आज फारच अस्वस्थ दिसत होते. दुपारचा रवि आकाशात तळपत होता आणि इकडे सूर्याजीरावांचा तिळपापड होत होता. ते मोठ्या आतुरतेने त्यांचे मुख्य वार्ताहर आणि मुलाखत तज्ञ, काका सरधोपट यांची वाट पहात होते. ‘रोजची पहाटच्या दिवाळी अंकाची ओरात तयारी चालू होती आणि या काकांचा पत्ताच नव्हता! काकांची मुलाखत हे दिवाळी अंकाचे प्रमुख आकर्षण असायचे. आपल्या टकलावर अतिरागाचा ठेका धरत ते ओरडले.

अरे पांडोबा 55

जी सरकार !

पांड्या तुला किती वेळा सांगितल हे नाटकी भाषण बंद कर म्हणून? हे ऑफीस आहे का मोगल दरबार ?

“चुकलो साहेब, कशाला हाक मारलीत?

अरे त्या काकाचा पत्ता काय? आता बारा वाजून गेले तरी याचा पत्ता नाही?”

साहेब ने मुलाखतीच्या कामासाठी फिरत असणार येतीलच येवढ्यात्- इतक्यात काकाच येतात.

अरे काका कुठे होतात? आणलीत का मुलाखत? कसली मुलाखत साहेब? अहो तो हातोडे भेटायला नर हवा न्य?”

म्हणजे अजून भेटलाच नाही? आता हातोडे म्हणजे, पूलतज्ञ, मा.रा. हातोडे. परवाच सावीत्री नदीवरील पूल कोसळला त्यामुळे पूल का कोसळतात ? हा विषय सध्या ऐरणीवर असल्यामुळे रोजची पहाटेने त्यावर मा. रा. हातोडे, या पुलतझांची मुलाखत हे आपल्या दिवाळी अंकाचे यंदाचे आकर्षण ठरविले होते आणि त्यांची मुलाखत घ्यायचे काम काका सरधोपट यांच्यावर सोपवले होते. “साहब केंद्रीय महामार्ग-मंत्री महोदयांनी त्यांना देशातील सभळ्या जुन्या शंभर वर्षापूर्वीच्या पूलाचे निरीक्षण करून योग्यती कारवाई तातडाने करायच्या सूचना, आदेश दिले  आहेत. त्यामुळे ते सतत गावोगावी हातोडे मारत फिरत आहेत. त्यातून त्यांना वेळ मिळणे मुश्किल होते. तरीही ‘रोजची पहाटची किर्ती त्यांच्या कानावर आहे त्यामुळे त्यांनी उद्या दहा वाजता नागपूतला डाक बंगल्यावर बोलावले आहे. उद्या त्यांना भेटून उद्याच संध्याकाळी मुलाखत आपल्याला देतो.”

वा, वा काका फार छान! लागा कामाला !

“साहेब एक विनंती.

बोला.

“साहेब हे दिवाळी अंकाचे काम झाल्यावर जरा माझ्या कामाकडेही पहा,”

“तुमचे कसले काम?

साहेब रोजची पहाटचे काम करता करता हा काका म्हातारा झाला. त्या / पुला प्रमाणेच कधी कोसळेल सांगता यायचे नाही. व्यपूर्वी काही पगार वाढ बोनस देणार का नाही?”

“हो साहेब काका म्हणतात ते खरे आहे. मी पण आता म्हातारा झालो. माझापण विचार करा.” पांडोबा.

सूर्याजी, काका आणि पांडोबा ही त्रिमूर्ती रोजची पहाटेच्या निर्मिती पासुनची मंडळी. मालक नोकरापेक्षा जास्त जवळची त्यामुळे त्यांची आपापसात अशी थहा मस्करी चालायची.

‘काका, पांडोबा, जरा कुठे कामाची गोष्ट काढली की तुमचे चालले तुणतुणे, तुमचे म्हणणे कळले. आता लागा कामाला. त्यानी तिघांसाठी चहा मागवला.

चहा घेऊन काका निघाले. उद्या सकाळी १० वा. हातोड्यांना गाठायचे म्हणजे शमीची गाडी पकडून निघायला हवे.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यांनी नागपूरच्या डाक बंगल्यात मा.रा. हातोडे साहेबांची गाठ घेतली. त्याच्या नरावरच्या शिपायाने नाव विचारून त्यांना आत सोडले. ते आत गेले.

‘या या काका साहेब. मला फार थोडा वेळ आहे. अजून पन्नास टक्के काम बाकी आहे. त्यांनी हातातला हातोडा टेबलावर हाणला ! दाणकन आवाज झाला! तसा बाहेरचा शिपाई आत आला.

अरे जा काकांसाठी चहा नाष्टा पाठवून दें”

“जी” म्हणून तो गेला.

हा काका विचारा तुमचे प्रश्न.

हाताड़ साहेब सावित्री वरचा पूल कासवला. तो शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बांधला होता. अशा पुलांचे आयुष्य किती असते? तो कोसळ्याची कारणे काय? ”

काका एखादा रस्ता, पूल, इमारत बांधल्यावर त्यांचे किती हे सांगणे कठिण. मुळात आपण कितीही गणिते केली तरी निसर्गाच्या दशक्ति समोर त्यांचा किती पाडाव लागेल हे सांगता यायचे नाही. शंभर वर्षापूर्वी काय स्थिती होती? पूल बांधतांना काय गणिते केली होती? बांधकाम कसे झाले?

देखभाल कशी झाली, कशी होत होती इत्यादी अनेक गोष्टी आहेत. कोणत्या एका गोष्टीकडे बोट दाखवणे शक्य नाही.

एक तज्ञ म्हणून आपणास काय वाटते?

काका एक तज्ञ म्हणून माझे मत आणि इतर तझांची मते जुळून येणार नाहीत म्हणतात जा की, पिंडे पिंडे मतिर्मिन: तसेच तज्ञे वझे मतिर्भिन: कुणी म्हणेल बांधकामात ब्रिटिशांनी काही भ्रष्टाचार केला का? कुणी म्हजेल बांधकाम साहित्यात काही भ्रष्टाचार झाला, कुणी म्हणेल देखभाल नीट झाली नाही, कुणी म्हणेल डिझाइन कमकुवत होते, कुणी म्हणेल १०० वर्षांनी पाण्याचा जोर वाढला, कुणी म्हणेल रहदारीचे गणीत चुकले, अशी अनेक मते पडतील. या मता मतांच्या गदारोळात कुठले  मत योग्य ठरवायचे?

थोडक्यात नक्की मत देणे शक्य नाही. पण हा पूल ब्रिटिशांनी बंधला त्यामुळे तो शंभरवर्षे तरी टिकला असे म्हणतात. पण आपण अलिकडे बांधलेले रस्ते, फूल, इमारतीही कोसळतात, रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडतात ते का? निकृष्ट बांधकाम, भ्रष्टाचार ही त्याची कारणे नाहीत का?”

‘काका’ मुळात आपण ज्या पद्धती आजही वापरतो तो वारसा आपण ब्रिटिशांपासूनच घेतला आहे. त्याकाळी एकच साहेब बहुदा इंजीनियर, तज्ञ त्या कामावर देखरेख करीत असे. आता त्या एकाच कामावर ठेकेदार, ग्रामपंचायत सभापती, जिल्हा परिषद सभापती, पालक मंत्री, खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री, त्या सर्वांचे पिले असे शंभर लोक असतात. त्या सर्वांचे सल्ले आणि हात ओले करता करता मुळे कामाची लवकरच तिरडी आवनायची वेळ येते. वारसा त्यांचाच नव्हे काय? तो आपण जन कल्याणार्थ मोठ्या प्रमाणावर आणि तळागाळा पर्यंत पोहोचवला आहे. वा, ब्रिटिशांनी दिलेला वारसा आपण इमाने इतबारेकसा विस्तारला आहे हे आपल निरीक्षण खरोखरच न्याय वाटत. मग हा भूषणास्पद वारसा जपून आपण असे पुल, रस्ते, इमारती वगैरे कोसळूनयेत, लवकरच निकामी होऊ नयेत म्हणून आहे त्या चौकटीतच काय करावे असे एक तज्ञ म्हणून आपले काय मत आहे? ‘

‘काका आपल्या देशात ‘त’ ही उपाधी लावायला त्या विषयातील शैक्षणिक पात्रता व्यतिरिक्त, शैक्षणिक अपात्रता असूनही लोक प्रतिनिधी ही सर्वोच्च पात्रता असणाऱ्या तज्ञांच्या मताशी आणि मतलबाशी जुळवून घेणे ही मोठी पात्रता असणे आवश्यक आहे. ते एकदा जुळले की अग इमारती कोसळूघा, पूल कोसळूघा, खडे पडू द्या, कामाच्या खर्चाचे डोंगरच्या डोंगर होऊ द्या काही चिंता आही. असे कित्येक कोसळले, मेले, होत्याचे नव्हते झाले, थोडा आकोत, आरज, ओरडा, चौकड्या कमिठ्या इ. यथासांग होते. खेळ येरे माझ्या मागल्या म्हणून पुढे चालू होतो. पूल कोसळला, इमारती भुईसपाट झाल्या असे प्रश्न मला पडतच नाहीत. ‘जो जन्मला तो मरणारच’या अंतिम सत्या प्रमाणे, जो बांधला तो कधितरी कोसळणारच ‘इतके साधे ते तत्व आहे. त्यामुळे गप्प बसा आणि वेळ काढा. काळ हाच त्यावर जालिम उपाय आहे असे एक तज्ञ म्हणून माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी बांधला काय किंवा आपल्या तज्ञांनी बांधला काय, चलती का नाम गाडी’ हे चिकाला बाधित सत्य स्वीकारावयास हवे. एकदा पूल बांधल्यावर तो कोसळतांना गाडीने पुलावरून उडी मारली तर ते तिचे नशिब वा, वा हातोडे साहेब, तज्ञांनी अध्यात्माचा अंगिकार करून ‘जे जे होईल ते ते पहावे चित्ती असो द्यावे समाधान, अशी वृती बाळगणे किती आवश्यक आहे ते पटले.

धन्यवाद! आपल्या तज्ञ मतावरून आता रस्ते, पूल इत्यादीवरून प्रवास करणारी जनता आपल्याला जीव मुठीत धरूनच प्रवास करणे भाग आहे या खात्रीने प्रवासास जाणे म्हणजे काशीयलिस जाणे या आपल्या प्राचीन काळच्या प्रथे प्रमाणे डाराबाहेर पडेल आणि जर सुखरूप परत आले तर घरी भावंदे घालतील. धन्यवाद !

— विनायक अत्रे 

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..