आदिनाथ कोठारे हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र असून स्वतः अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९८४ रोजी झाला. बालपणापासूनच त्याला अभिनयाची गोडी होती.. महेश कोठारे यांनी आदिनाथ कोठारे याला ‘माझा छकुला’ या चित्रपटातून लाँच केले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आदिनाथने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून दिली होती. अभिनय करता करता आदिनाथ यांनी एम.बी.ए. पूर्ण केले होते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला झपाटलेला २, खबरदार, इश्कवाला लव्ह, पछाडलेला, निळकंठ मास्तर असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत.
अभिनेत्यासोबतच आदिनाथ निर्माता म्हणूनही समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर ‘सरगम’ या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होते. शिवाय ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेचासुद्धा निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली.
चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११ मध्ये लग्न केले. आदिनाथ आणि उर्मिला हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply