सकाळीच उठल्यापासून मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आडनावाचा बारकाईने अभ्यास केल्यास मनोरंजन, झाल्याशिवाय राहात नाही. सकाळीच माझा मित्र मला बोलवायला आला. त्याने हिरो होंडा गाडी आणली होती. त्याने मला सांगितले, ‘आपल्याला माझ्या मामांकडे लगेच जायचंय. त्यांना दुपारच्या गाडीनं मुंबई मार्गे ‘हज यात्रेला’ प्रस्थान करायचंय. ‘ मी त्याला मध्येच थांबवीत म्हटले, ‘चल झकोला मत मार.’ तसा तो म्हणाला, ‘अरे तसं मी खोटं बोलत नाही.’ परंतु माझ्या मामांचं आडनावच जखुरा आहे. (त्याचे नाव. होते M.I.JAKHURA).’ दवाखान्यात जाण्याचे काम पडले की हमखास माझे डॉ. सन्मित्र मला आठवतात. त्यांचे आडनाव आहे ‘खोकले’. आता मलाही ‘खोकला’ झाला म्हणजे दोहोचा मेळ बसणे आलेच.
एकदा मला दुपारच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले, ते मी स्वीकारलेही. आणि नेमके ते घर कोठे ते विसरलो. भलत्याच गल्लीबोळात ते घर शोधू लागलो, तसे समोरून दोन शाळकरी मुलींनी लगेच मला विचारले, ‘काका, आपणास कुणाकडे जायचंय? ‘ मी लगेच माझी अडचण त्यांना सांगितली. ‘मला ‘देवा’ कडे जायचंय. ‘ त्या ‘आ’ करून माझ्याकडे पाहू लागल्या. माझे काय चुकले मलाच कळेना!
कालच बँकेत गेलो होतो. एकाने मला फॉर्म भरून मागितला.
त्याने मला त्याचे नाव सांगितले तसा मी विचार करीत बसलो. त्याचे नाव होते ‘अशोक’ व आडनाव ‘धर्माधिकारी’, त्याने तशी फॉर्मवर सही केली ‘अ धर्माधिकारी’.
वाचकांनीच याचा विचार करावा.
अचलपुरात एके ठिकाणी माझ्या मित्राचे नाव होते धडाधडी. मला वाटते, त्यांच्या घरातील भांडी नेहमी फळीवरून खाली पडत असावीत. तर माझ्या मामांचे आडनाव ‘मोडक’ आहे. आम्ही त्यांच्या आडनावाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार देऊन त्यांच्या सुंदर घराचे ‘मोडकं यांचे घर’ म्हणून खिल्ली उडवीत असतो. घराजवळची पिठाची चक्की नादुरुस्त झाल्याने दूरच्या चक्कीवर दळण टाकायला गेलो होतो. (घरून सांगितलं होते की दळण बारीक आणावे. पाटीवर नव्या गिरणीवाल्याचे आडनाव वाचले अन् तो डबा तसाच घरी परत आणला. त्याचे आडनाव होते ‘ठोकळ’. अन् खाली वाचले ‘ठोकळ दळण केंद्र. ‘ आता तेथे कसे दळण न्यावे? हाच प्रश्न मला पडला होता. एके दिवशी सकाळीच मी मित्रांकडे बसलो होतो. शेजारच्या घरी फाटकाजवळ एकाने आवाज दिला ‘चहाकर’ एवढ्या अधिकारवाणीने चहाची ऑर्डर देतोय आणि फाटकातून आत येण्यापूर्वीच त्याचे नाव सांगितले तसा मी विचार करीत बसलो. त्याचे नाव होते ‘अशोक’ व आडनाव ‘धर्माधिकारी’, त्याने तशी फॉर्मवर सही केली ‘अ धर्माधिकारी’. वाचकांनीच याचा विचार करावा. अचलपुरात एके ठिकाणी माझ्या मित्राचे नाव होते धडाधडी. मला वाटते, त्यांच्या घरातील भांडी नेहमी फळीवरून खाली पडत असावीत. तर माझ्या मामांचे आडनाव ‘मोडक’ आहे. आम्ही त्यांच्या आडनावाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार देऊन त्यांच्या सुंदर घराचे ‘मोडकं यांचे घर’ म्हणून खिल्ली उडवीत असतो. घराजवळची पिठाची चक्की नादुरुस्त झाल्याने दूरच्या चक्कीवर दळण टाकायला गेलो होतो. (घरून सांगितलं होते की दळण बारीक आणावे. पाटीवर नव्या गिरणीवाल्याचे आडनाव वाचले अन् तो डबा तसाच घरी परत आणला. त्याचे आडनाव होते ‘ठोकळ’. अन् खाली वाचले ‘ठोकळ दळण केंद्र.’ आता तेथे कसे दळण न्यावे? हाच प्रश्न मला पडला होता.
एके दिवशी सकाळीच मी मित्रांकडे बसलो होतो. शेजारच्या घरी फाटकाजवळ एकाने आवाज दिला ‘चहाकर’ एवढ्या अधिकारवाणीने चहाची ऑर्डर देतोय आणि फाटकातून आत येण्यापूर्वीच.
म्हणजे फारच झाले. मी तसा प्रश्नार्थक विचार चेहऱ्यावर दाखविताच, तो घरातून येत मला म्हणाला, ‘एवढा कसला विचार करता? आमचं आडनाव चहाकर आहे व त्याचे ‘म्हणणे ‘चहा’ कर असे मुळीच नाही.’ आता सर्व ‘उलगडा’ झाला होता.
एकदा तर फारच मजा झाली आमच्या मित्र मंडळीतून एकाने त्याच्या नातलगांकडे सहज म्हणून जावे असा सूर काढला. आम्ही तसे निघालो, कुतूहल होतेच. मी माझ्या सवयीनुसार त्याच्या ‘घरावरील नावाची पाटी वाचली व थोडे चपापलो. घाबरलो. म्हटले आता आपले काही खरे नाही अन् आजच आपला शेवटचा दिवस ठरावा, कारण त्याचे आडनाव होते.
‘वाघ’. आता स्वस्थ बसण्यापलीकडे पर्याय नाही. असे असतानाच त्याने दार उघडले अन् माझी सर्व भीती क्षणार्धात लोप पावली, कारण तो त्याच्या पत्नीने धुतलेले कपडे वाळत टाकीत होता, अन् ती त्याला कामे सांगत होती. म्हटले धन्य हा वाघ !
मी व माझे वडील रात्रीच्या वेळी पाहुणे म्हणून त्या घरी गेलो होतो, त्यांचे आडनाव होते, ‘उपासनी’.
आता मी पुढे होत मिस्किलपणे म्हटलेच, ‘काकू, आमचं आडनाव सहस्र भोजनी असून आम्ही येथे थांबावं की जावं ते आत्ताच सांगावं.’
अर्थात हे विनोदी बोलणे त्यांना लवकर समजले म्हणून बरे झाले.
आम्हाला नव्यानेच लाभलेले साहेब, त्यांचे आडनाव होतं ‘चंदन’. आता जुने साहेब आमच्याकडून या ना त्या कारणाने दररोज २०, २५ रुपयाने आमचे खिसा कमी करीत असत.
मी विनोदाने म्हणायचो, ‘नवीन साहेब आता आपल्याला चंदन लावणार? सांभाळून रे !’
अशी ही आडनावांची यादी लांबत असताना याच ठिकाणी माझी चौकशी करायला आलेले गृहस्थ सांगू लागले, ‘कळलं की, तुमची पुतणी लग्नाची आहे! तिची माहिती द्यावी.’
मी त्यांना ‘परिचय’ विचारला त्यांनी त्यांचे आडनाव लांबट सांगितले आणि मी अवाक झालो, कारण माझी पुतणी ठेंगणी आहे हे सांगणे नलगे. मागच्या आठवड्यात सातारा येथे येणे, जाणे झाले, तेथे एके ठिकाणी वाचावयास मिळाले. ‘बिचके टेलर. आता येथे कपडे शिवणारा बहुधा पहिला तो शेवटचाच ग्राहक असावा, असे मला वाटले. खरे काय तेच जाणोत. माझेच जवळचे नातलग आहेत त्यांचे आडनाव पिंगळे आहे, कधी काळी ऐकले होते, दोन पिंगळे दिसले, तर ‘शुभ लक्षण’ आणि एकच दिसला तर ‘अशुभ’, खरे काहीच माहिती नसले तरी जेव्हा मी त्यांच्याकडे ऐन जेवणाच्या वेळी गेलो, तेव्हा त्यांचे घरी ते एकटेच होते, तरीपण मी पोटभर जेवून नव्हे, समाधानाने तृप्त होऊन निघालो, यां शुभ-अशुभाला काय म्हणावे?
आमचे मराठीचे सर, आपल्या विनोदी स्वभावाने सर्वांची मने जिंकून होते. त्यांचे आडनाव होते दहिकर. आम्ही म्हणजे मी नेहमी म्हणायचो – हे कसे दही करणार? दूध आणि ताकवाले एकत्र आले की हे तेथे आपोआप दिसतील आणि वर्गात हास्याची लहर उठत असे.
लोखंडे आणि सोने यांची मैत्रीच कशी असू शकते हे कोडे मला अजूनही सुटले नाही. तर पुरी आणि श्रीखंडे हे समोर दिसल्यावर कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही?
एकदा तर टकले साहेबासोबत गप्पा करीत असताना श्री. जटाधर तेथे आलेत, मी त्यांना विनंती केली की, आपण थोडे जरी आपले अस्तित्व यांच्या डोक्यावर स्थिरावले तर दोघांचेही कल्याण (इथे कल्याण शब्द मुद्दाम योजला आहे) झाल्यासारखे होईल.
आमचे नवीनच बदलून गेलेले साहेब त्यांच्या आडनावाने बरेच परिचित होते. त्यांचे आडनाव आठवत नसल्याने मी माझ्या मानगुटीवर कुणीतरी बसले आहे असा विचार करतो आणि मग मला आठवते यांचे आडनाव, कळले असेलच! त्यांचे आडनाव ‘मुनगुटीवार’.
असे हे आडनावांचे लांबलचक पाल्हाळ संपवत होतो, अर्थात लिहिण्याचे. तर त्यात व्यत्यय आणला त्याचे आडनाव आहे लिखीतकर.
आणि ते लिखाण असेच सुरू ठेवावे म्हणून सांगत होते. त्यांचे आडनाव आहे चऱ्हाटे, काय करावे असे वाटत असतानाच गुरुजींनी मला सुचविले की साबूकडे जावे आणि स्वच्छ संगणक कॉपी करून आणावी तर मी लगेच म्हणालो, ‘सध्या ते शक्य नाही कारण माझे सायकलचे वेल्डींग उखडले असल्याने त्यास डाग दिल्यावरच मी जाऊ शकेल तेव्हा प्रथम डागाकडे जाऊ या !’
तरी परंतु समाधान या गोष्टीचे वाटते की आमचे आडनाव असे नाव ठेवण्यासारखे नसावे हे तरी बरे, तर माझा एक विनोदी आणि हिन्दी मित्र मला दोन्ही खांदे उडवत म्हणाला ‘जाने लेकीन दो यार कुऱ्हेकर तू कुछ भी कर, मुझे चाय पिला दे.’
माझा भ्रम मिटला मी मुकाटपणे त्याचे चहाचे बिल देऊन मोकळा झालो, कारण माझा लहान मुलगा मला म्हणाला, ‘बाबा, लवकर घरी चला फुकट काकांनी बोलावलंय. ‘
मी घरी येईपर्यंत ते निघाले होते, फाटकाच्या बाहेर आणि मला मात्र निराळेच वाटले यात दोषी कोण?
– लक्ष्मण कुऱ्हेकर, मूर्तिजापूर.
Leave a Reply