नवीन लेखन...

मशरुम खाण्याचे फायदे काय आहेत

मशरुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मशरुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून वृद्धांच्या आवडीची भाजी आहे. यात इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्व आढळून आले आहे. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो. मशरुममध्ये उपस्थित एंटी ऑक्सीडेंट आपल्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतो.

Image result for मशरुमचे फायदे काय आहेतमशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. त्यामुळे मशरुम खाणं खूप गरजेचं आहे. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आपण अनेक उद्योग करत असतो. मग त्यात आजपासून जेवणात मशरुमचा समावेश करा.  जाणून घेऊयात मशरूमचे आरोग्यदायी फायदे:

  1. हे ब्लड प्रेशर सारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. जे लोक या आजारांपासून त्रस्त आहे, त्यांना मश्रुमचे सेवन आवश्यक करायला पाहिजे.
  2. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटही असून यामुळे शरीरातील वाढत्या वयाच्या लक्षणं दिसत नाहीत. मशरूममध्ये कोलीन नावाचं एक खास पोषक तत्त्व आढळतं. जे स्नायूंची सक्रियता आणि स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी मदत करते.
  3. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्‍याच वेळेपर्यंत भूक लागत नाही. त्या शिवाय मश्रुम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे.
  4. मशरूममध्ये कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. त्यामुळे आरोग्य चांगलं राहू शकतं. म्हणुन रो़जच्या जेवणात थोडं तरी मशरुम खाणं गरजेचं आहे.
  5. मधुमेहाच्या रुग्णांना जे काही हवे असते ते सर्व मश्रुममध्ये उपस्थित आहे. यात व्हिटॅमिन, मिनरल आणि फायबर असत. यात फॅट, कार्बोहाइड्रेट आणि शुगर देखील राहत नाही, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूपच चांगले आहे. हे शरीरात इन्सुलिनचे निर्माण करतो.
  6. कॅन्सरच्या पेशींवर आळा घालण्यासाठीही मशरूम उपयुक्त ठरते. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की, मशरूम खाल्यानं कॅन्सरपासून शरीराचा बचाव होतो.
  7. मशरूममध्ये विटामिन डी देखील असते. हे विटामिन हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते. मशरुममुळं अनेक आजार दूर करण्याची ताकद आहे. अनेक गोष्टींवर मात करण्यासाठी मशरुम उपयुक्त आहे. रोज नाही तर आठवड्यातून एक दिवस तरी मशरुम जरूर खावे.

सूप, भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. मशरूम तुम्हाला दीर्घ काळासाठी तरूण व सुंदर बनवेल. नेहमी तरूण व उत्साही राहायचे असेल तर आजपासून मशरूम खाणे सुरू करा.

Sanket

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..