नवीन लेखन...

जाहिरातकार व ललित लेखक सुरेश नावडकर

जाहिरातकार व ललित लेखक सुरेश नावडकर यांचा जन्म २२ मार्च १९५९ रोजी साताऱ्याजवळील एका गावी झाला.
सुरेश नावडकर यांचे वडील पुण्यात काॅर्पोरेशनच्या शाळेत शिक्षक होते व सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरच्या शेजारी एका वाड्यातील दोन खोल्यात रहात होते. भरत नाट्य मंदिरात होणाऱ्या नाटकांमुळे, मोठमोठे नामवंत कलाकार जवळून पाहिले.
सुरेश नावडकर यांचे शालेय प्राथमिक शिक्षण भावे प्राथमिक स्कूल व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड व रमणबाग शाळेत झाले. तिसरीत असताना त्यांना रांगोळी स्पर्धेत पहिलं बक्षिस मिळालं.. इथूनच चित्रकलेविषयी आवड निर्माण झाली. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे झालं. दहावीपर्यंत चित्रकलेच्या स्पर्धेत भाग अनेकदा भाग घेतला, बक्षिसं मिळवली.
अकरावीला रमणबाग शाळेत असताना त्यांना तिथे कलेला प्रोत्साहन मिळालं. पुढे त्यांनी बीएमसीसीत बी.काॅम. केलं ! बीएमसीसीत असतना बाळासाहेब सरपोतदार यांचा मुलगा, अजय सरपोतदारची दोस्ती झाली. काॅलेजमधून बाहेर पडल्यावर सुरेश व त्यांचे बंधू रमेश दोघांनी मिळून जाहिरातींचा व्यवसाय सुरु केला. पुढे अजयने त्याचे काका, गजानन सरपोतदार यांच्या ‘सासू वरचढ जावई’ या चित्रपटाचे पेपर पब्लिसिटीचे सुरेश व रमेश यांना काम दिले. रमेश यांनी जी.डी. आर्ट कमर्शियल केले होते.
प्रकाश इनामदार यांनी नाटकांची डिझाईन्स करण्याचे काम दिले. श्रीराम बडे यांनी बालनाट्यांची अनेक डिझाईन करुन घेतली. मनोरंजन संस्थेकडून मुंबई व पुण्यातील नाटकांची डिझाईन्स करण्याची संधी मिळू लागली. ओळखी वाढत गेल्या व कामाचे प्रमाण वाढले.. आधी काम घरुन केले जायचे. सुरेश नावडकर यांचे अरविंद सामंत यांच्या रौप्यमहोत्सवी ‘थरथराट’ चित्रपटाची जाहिरात केल्यापासून ‌या क्षेत्रात नाव झाले. अजय सरपोतदार यांच्या ‘पैंजण’ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट जाहिरात केल्याबद्दल पहिल्यांदा राज्य पुरस्कार मिळाला. दादा कोंडके यांनी ‘वाजवू का’ चित्रपटाचे स्थिर चित्रणाचे काम दिले. त्यामुळे दादांचा खूप सहवास लाभला. चित्रपट पूर्ण झाल्यावर जाहिरातीचेही काम केले. त्यानंतर स्मिता तळवलकर यांच्या ‘तू तिथं मी’ या चित्रपटासाठी स्थिरचित्रण व जाहिरात दोन्ही कामे सुरेश नावडकर यांनी केली. हा चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला. या कामाबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
मराठी चित्रपटाची कक्षा रुंदावणाऱ्या ‘बिनधास्त’ चित्रपटाची डिझाईन करताना निर्माते चाटे, यांच्याशी संपर्क आला. त्यांनी जाहिरातींवर अफाट खर्च केला. या चित्रपटासाठी तिसरा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. संजय सूरकरच्या ‘सातच्या आत घरात’ साठी स्थिरचित्रणाचे काम केले.
ही कामं चालू असतानाच मुंबईतील ‘सुयोग’चे सुधीर भट यांनी सुरेश नावडकर यांना ‘मोरुची मावशी’ पासून २७ नाटकांची डिझाईन्सची कामे दिली. त्या नाटकांच्या डिझाईन करण्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर कलाकारांशी जवळून संपर्क आला. २०१२ पर्यंत नाटक, चित्रपटांची कामे बऱ्यापैकी होती. नंतर ती हळूहळू कमी झाली. त्यावेळचे निर्माते, दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेले. नवीन निर्मात्यांशी परिचय नसल्याने व आधुनिक तंत्रज्ञानामुळे जाहिरातींची कामे, मुंबईतच होऊ लागली.
    ‌
डिजिटल कॅमेरे आल्यामुळे, फिल्मचे कॅमेरे कालबाह्य ठरले. सहाजिकच स्थिरचित्रणाची कामं बंद झाली. चित्रपटांसाठी आता पोस्टरची गरज नसल्याने सर्व जाहिरातीही डिजिटल झाल्या.
सुरेश नावडकर हे  पुस्तकांची मुखपृष्ठ आधीपासून करीत होतेच. आता त्या कामाकडे पूर्णपणे वळले. सुरेश यांनी पुण्यातील अनेक प्रकाशकांचे काम केले. अनेक मान्यवर लेखक व प्रकाशकांच्या ओळखी झाल्या. दिवाळी अंकांचे काम केले. श्रीकृष्ण करमरकर या ‘अवनी’ दिवाळी अंकांच्या संपादकांचे २५ वर्षे काम केले.
कोरोनाच्या काळात मोबाईलवर ललित लेख, व्यक्तिचित्रे, आठवणी, कथा लिहिल्या व फेसबुकवर सुरेश नावडकर यांनी पोस्ट केल्या. अनेक नवीन वाचकांचा, मित्रपरिवार वाढला.
सुरेश नावडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..