नवीन लेखन...

अफलातून योजना

रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी  गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच  आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो,  विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती.  लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. २०-२२ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शासकिय रुग्णालयाचे प्रमुख होते. कुशल सर्जन, व्यवस्थापक, व अत्यंत प्रेमळ सुस्वभावी व्यक्ती. कोणता प्रसंग आला असावा की ज्याने जीवनाच्या शेवटच्या टप्यावर भाजी विक्रेत्याचे काम करावे लागत आहे. त्यांच्या बद्दल नितांत आनंद, प्रेम भावना असल्यामुळे माझी निराशा, बेचैनी, मला अधिकच अस्वस्थ करु लागली. त्याना नमस्कार केला. त्यानाही खुप आनंद झाल्याचे दिसले. बरांच वेळ मोकळेपणाने गप्पा केल्या. त्यानी सद्य परिस्थीती बद्दल जे सांगितले, त्याची मी कल्पना देखील करु शकत नव्हतो.

डॉ. विकास जोशी यांनी कथन केले ते असे होते.

“  भाजी विक्रेता सखाराम. त्याची पत्नी व मुलगी निलीमा. दररोज एखादी भाजी आणून देत असे. कधी तो, पत्नी वा मुलगी निलीमा.  सखाराम गरीब होता. चांगला स्वभाव, कुटुंबीयांच प्रेमळ वागण, हे मनाला समाधान व आनंद देणारे होते. जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा द्दष्टीकोन. जीवन जगण्याची धडपड ही कौतुकास्पद वाटत होती. त्याचा तिच्या लहानग्या निलीमामध्ये फार जीव होता. तीला विलक्षण व्यक्तिमत्वाची तयार करण्याचा मानस.

एक अफलातून योजना निर्माण झाली. प्रमुख विचार होता. सखारामच्या मुलीला निलीमाला मदत करणे. तिचे व्यक्तीमत्व बनण्यास हातभार लावणे.

सेवेमधून निवृत्त होऊन २२ वर्षे झाली. निवृत्तीवेतन भरपूर व नियमीत मिळत होते. संसाराची सारी अपेक्षित कर्तव्ये पार पडली होती. सर्व मुले आपल्यापरी स्थिरावली होती. आता मजसाठी फक्त एकच काम होते. प्रकृतीची शारिरीक व मानसिक काळजी घेत उर्वरीत आयुष्य समाधान व आनंदाने पूर्ण करणे. ८० वर्षे व्यवसथीत जगलो. आता सध्यस्थितीत असे रहावे की ज्यात समाधान व आनंद लाभेल. तेच शांतता निर्माण करेल.

सखाराम बरोबर मी एक योजना सादर केली. सुरवातीचे अर्थाजन माझे . चार चाकी ढकल गाडी, भाज्या विकण्यासाठी अद्यावत इलेक्ट्रॉनिक वजन काटा,  त्यांत भाज्यांचे वजन व त्याची दर्शविलेली किमंत लगेच कळत असे. सखारामच्या नांवे महानगरपालिकेमध्ये रजीस्ट्रेशन,  व्यवसाय करण्याची परवानगी देखील घेतली गेली.

त्याला फक्त दोनच सुचना केल्या १- ) या पुढील सर्व खरेदी-विक्री व नफा हे सारे तो स्वतंत्रपणे करण्यास मोकळा आहे. त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप असणार नाही.

२- ) जो नफा मिळेल, त्याचा दहा टक्के नियमीत मला द्यावा.

मी दररोज सकाळी तीन – चार तास त्याच्या भाजीच्या ( व्यवसायाच्या) गाडीजवळ बसू लागलो. व धंद्यात सक्रीय भाग घेऊ लागलो. सखारामला भरपूर वेळ मिळू लागला. मोठ्या घाऊक बाजारांत जाणे, भाज्या आणने, स्वच्छ करणे, व्यवस्थित जोडणे, अशीच अनेक धंद्यासाठींच्या  कामांत तो लक्ष देऊ शकला. मला देखील बराच शारिरीक व्यायाम, हालचाल व बौद्धीक समाधान लाभत गेले. मिळणारे सारे पैसे एका पेटीत टाकून ते त्याच्याच हवाली केले जाई. त्याला मिळालेल्या पैशाची केंव्हाच चर्चा केली नाही. मी फक्त व्यवसाय करण्यामधला आनंद व समाधान घेत होतो. हीच मला जीवन शांतता देत होती. तेच तर माझे ध्येय होते.

डॉ. जोशीनी आपल्या बँगेमधून पोष्टाचे एक पुस्तक काढून दाखविले. सखाराम कडून नियमीत मिळणरी सारी रक्कम  ह्या पासबुकांत जमा करतो. हे पुस्तक सखारामची मुलगी निलीमा हीच्या नांवे आहे. योग्य वेळी हे सारे पैसे तिलाच मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. या पोष्टाच्या पास बुकाची माहिती कुणालाही नाही. सखारामला देखील.

कोणतेही घेतलेल्या कार्य एखाद्या नाण्याप्रमाणेच ” असते. नाण्याच्या दोन बाजू ज्यांत

तुमचे प्रयत्न श्रम धडपड, तसेच काळजी, शंका, तगमग, यश-अपयशाची चिंता इत्यादी पैलूंचा गुंता,  सतत  सुख दुःखाच्या लाटा निर्माण करतात . याला जीवन ऐसे नांव. ज्याचा सखाराम कुटूंबीय अनुभव घेत होते.

२ – तेथे निखळ समाधान व शांतता वास करते. जे मी ( कल्पनेने )अनुभवण्याचा प्रयत्न करीत होतो.

कार्य योजताना तीन बाबींचा विचार केला. ध्येय, परिस्थीती,आणि योजना.  योजना मी घेतली. परिस्थीती व ध्येय दोन्हीची जबाबदारी सखारामच्या अर्थात त्या भाजी विक्रेत्याच्या कुटूंबावर सोडून दिली. योजनेचे फक्त समाधान मी अनुभवत असे. परिस्थीती व ध्येयाचे सुख दुःख हे दोन्ही सखाराम कुटुंबीय  अनुभवत होते.     

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..