नुकतीच नागोठणे येथील एक पोस्ट सोशल मिडियावर फिरतेय. अजगराने मुलीला गिळले.. अशा शिर्षकाने…..
सोशल मीडियाचा गैरवापर म्हणतो तो हाच. कुठलीही माहिती कुठेही जोडायची आणि वायरल करायची.
रेटिक्युलेट पायथन (जाळिदार अजगर) हा अंदमान निकोबार बेटावर आढ़ळतो .त्याची लांबी 32 फुट एवढी नोंदली आहे. एवढा मोठा अजगर माणसाला इजा पोहचवु शकतो ,पण अजून तरी तशी नोंद भारतात नाही.
सध्या वायरल होत असलेली पोस्ट व त्यातील फोटो ज्यात माणसाचे पाय दिसत आहेत तो एका विषारी सापाचा फोटो एडिट केलाय, अजगराला विषारी सुळे (दात) नसतात.आणि जो गाडिमधे काहीतरी खाऊन आहे तो जाळीदार अजगर आहे. हे फोटो भारतातले नसून ते खुप जूने आहेत.
आपल्या कड़े इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) आढ़ळतो.त्याची लांबी 25 फुट एवढी नोंदली आहे.या अजगराने आता पर्यन्त माणसाला गिळल्याची नोंद नाही. कुत्रा मांजर कोंबड्या शेळ्या मेंढ्या यांच्या मागे इंडियन रॉक पायथन मनुष्य वस्तीत येण्याच्या घटना कॉमन आहेत.
कृपा करुन आधीच बदनाम केलेल्या या असहाय जिवाना आणखी बदनाम करू नये यासाठी सर्वानी प्रामाणिक प्रयत्न करू या.
या अशा पोस्ट या जिवाना नामशेष करण्यासाठी पुरेशा असतात. अज्ञान हे आंधळ असतं. आपण भारतीय सत्य जाणुन घेण्या ऐवजी अंधानुकरण करण्यात पुढे आहोत.
— FON फ्रेंड्स ऑफ़ नेचर ,चिरनेर
उरण-रायगड
Leave a Reply