आज हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त १ जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली जायची, ‘इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असा आवाज घराघरातून ऐकू यायचा. हा आवाज कुठेतरी आज लुप्त होताना दिसून येतोय. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठीचा हा आवाज पुन्हा कसा घुमेल यासाठी आजच्या कृषी दिनापासूनच प्रयत्न करायला हवे आहेत.
भारतीय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची आजची परिस्थीती सुधारणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगात वावरणारे लोकं कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात. पण त्याची कोणालाच जाण नसते. शेतकरी हा शब्द जेवढा बोलायला सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नाही.
शेती करतांना अनेक अचानक येणाऱ्या संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो, ज्यात बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बॅंक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल या सर्व संकटांला शेतकरी प्रत्येक वेळेस सामोरे जातो असतो. हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो लाखो पैसे खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला कधी फळं मिळतेच असे नाही. त्यामुळे सगळे बदलायला हवे आहे. पुन्हा एकदा ‘इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असा आवाज घराघरातून ऐकू यायला हवा. शेतकऱ्यांसाठीचा हा आवाज पुन्हा कसा घुमेल यासाठी आजच्या कृषी दिनापासूनच प्रयत्न करायला हवे आहेत. आजच्या कृषी दिवसाच्या निमत्ताने तमाम शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply