एके काळीं हवे होते,
मजलाच सारे कांहीं
आज दुजाला मिळतां
आनंद मनास होई
माझ्यातील ‘मी ‘ पणानें
विसरलो सारे जग
तुझ्यामध्येंही ‘ मी ‘ आहे,
जाण येई कशी मग
जेंव्हा उलगडा झाला
साऱ्या मध्ये असतो ‘मी’
आदर वाटू लागला,
जाणता ‘अहं ब्रह्मास्मि‘
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply