अहंकार हा माणसाचा स्थायी गुणधर्म आहे असे मला वाटते.आपण उपजतच अहंकारी असतो हे सत्य स्वीकारायला हवे.तसाही थोडाफार अहंकार असायलाच हवा. तसा नसेल तर समाज आपल्याला जगू देणार नाही.पण हा अहंकार किती हवा याचे मोजमाप करणे फारच कठीण. आपण अहंकारी आहोत याची जाण आपणास आली की तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असते.
आपल्या अंगी काही खास कर्तृत्व असेल,आपल्याला आयुष्यात भरभरून यश मिळत असेल,आपण विद्वान असू किंवा समाजात आपल्याला कोणत्यातरी कारणाने मानाचे स्थान असेल तर अहंकारात वाढ होते.आपण इतराना तुच्छ लेखतो.आपली मते दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करतो.बरेचदा आपण दुसर्यापेक्षा वयाने मोठे असणे हे अहंकाराचे कारण होते.
खरे समाजातील कोणत्याही कारणाने उच्च पदावरील व्यक्तीने आपण कमीत कमी अहंकारी कसे जगू याचा प्रयत्न करायला हवा.पण ज्ञानाने,वयाने मोठी असलेली तसेच कलावंत माणसे अधिक अहंकारी असतात अस आपला सर्वांचाच अनुभव असतो.”विद्या विनयेन शोभते” अस म्हणतात पण ते प्रत्यक्षात आपण आचरणात आणतो का? याबाबत आत्मचिंतन केल्यास ज्ञानामुळे वाढलेला अहंकार कमी होण्याची शक्यता असते.”शक्यता असते” अस म्हटल कारण
अहंकार कमी करण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न करायला हवे.आपला अहंकार कमी झालाय याचा दाखला समाजाने द्यायला हवा.”मी अहंकारी नाही” असा आपणच आपल्याला दाखला घेवू नये.
शरद प्रभुदेसाई
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक शरद प्रभुदेसाई ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply