अहंकार हा जोड मित्र मनाचा
परी तो हवा हा पण ही मनाचा
मना सांगू नको ते ऐकूस काही
मी तुझ्यात आहे नी,मी तुझ्यात नाही
अर्थ–
अहंकार हा शब्द केवळ शब्द म्हणून मनात ठेवला तर त्याची बाधा होत नाही पण, जरका तो शब्दरूपी न राहता त्याच्या मैत्रीत आपलं मन गुंतलं तर मात्र तो त्याच्या मैत्रीसाठी वाट्टेल ते करायला लावतो आणि आपण ते करतो कारण आपला आपल्या मनावर ताबा नाही.
उपमा करताना रवा आणि शेंगदाणे यांचा मिलाप होतो. पण जर शेंगदाण्याच्या पुडित चुकून रवा गेला तरी त्या शेंगदाण्याचे पावित्र्य संपून जात नाही. म्हणजे काय? तर जरी असे झाले तरी आपण ते शेंगदाणे साफ करून चांगले भाजून मग त्याची साले काढून त्याचे कूट करून ते येणाऱ्या उपवासाला वापरतोच. तसेच मनाचा अहंकाराशी येणारा मिलाप जर आपल्याला प्रमाणित ठेवता आला तर आपण अहंकाराला आपल्या मनात ढवळा ढवळ करू देत नाही. पण त्यासाठी मनावर ताबा मिळवायला हवा. म्हणूनच मनाला काय सांगावं, काय सांगू नये, काय दाखवावं, काय दाखवू नये हे ठरवता आले पाहिजे. आणि यासाठीच श्रीमद दासबोध वाचावा. त्यात चौथ्या समासात समर्थांनी माणसाने माणसाशी कसे वागावे आणि स्वतःशी कसे रहावे याचा उलगडा केला आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply