लाभले असता सर्व काही..
त्याची कधी मोजदाद केली नाही..
जे थोडेसे काही मिळाले नाही..
त्याची मात्र मोजणी थांबली नाही..।।..१
मन मोकळे कधी ठेवले नाही..
फक्त स्वानंदात रमलो..
मी , फक्त मीच एकटा सर्वज्ञ..
हा अहंकार कधी सोडला नाही..।।..२
काय म्हणावे अशा प्रवृत्तीला ?..
अरे झाडा सारखे जीवन असावे..
जे जे आहे , ते ते सर्व देत रहावे..
सर्वांती उमजावे , इथे आपुले काही नाही..।।..३
©️वि.ग.सातपुते.( भावकवी)
9766544908
रचना क्र.५२ / ६-४-२०२१.
Leave a Reply