मिरची तिखट आहे, अन्नाची चव आणि वास दोन्हींना वाढवते. कोलेस्टेरॉललासुद्धा कमी करते. पण अल्सर होण्याची भीती पण वाढते.
एकाच वेळी एखाद्या पदार्थाचे गुण पण सांगितले जातात, आणि अवगुण पण.
गुण वाचताना वाटते…
व्वा. याच्याएवढं चांगलं काहीच नाही, किती चविष्ट आहे ! छान छान !!
आणि अवगुण वाचताना वाटतं, याच्याएवढं डेंजर आणि तिख्खट दुसरं काही नाही.
(मी मोदींबद्दल बोलत नाहीये, तिखट चवी विषयीच बोलतोय.)
कसं ते बघा.
तिखट चव इंद्रियांना उत्तेजना देणारी पण शुक्राचा नाश करणारी आहे.
योग्य प्रमाणात मूर्च्छानाशक तर जरा जास्ती प्रमाणात चक्कर यायला मदत करणारी आहे.
योग्य प्रमाणात भूक आणि पचनशक्ती वाढवणारी आहे, तर जरा प्रमाणात चुकले तर अंगाची पोटाची आग करवणारी आहे.
कफनाशक, शरीरातील ओलावा कमी करणारी आणि बंधने सैल करणारी आहे तर त्याच वेळी अशक्तपणा वाढवणारी, धातुंचे बल नाहीसे करणारी पण आहे.
त्वचा रोगांवर उपयोगी पण आहे आणि त्वचेतून रक्तस्राव घडवणारी पण आहे.
प्रमेहात उपयोगी पण आहे, आणि नपुंसकता वाढवणारी पण आहे.
एकाच वेळी ही दोन दोन परस्परांना विरोधी वाटणारी कामे कशी होतात, मराठीत सांगायचे झाले तर हे वाचून फक्त कन्फ्युज व्हायला होते. नेमकं काय करायचं कळतंच नाही.
असं गोंधळून जाऊ नका. पॅनिक होऊ नका.
दोन्ही बाजू बरोबर आहेत.
आहार सहा चवींचा हवा, हे तर आपलं आधीच ठरलेलं होतं. प्रश्न आहे, महत्व कुणाला द्यावं ?
मिरची खावीशी तर वाटते, पण तिखट लागता नये.
कोलेस्टेरॉल कमी तर झालं पाहीजे, पण अल्सर होता नये. सगळं एकदम कसं जमणार ?
वर वर बघताना वाटते, हे खूप डेंजर आहे, पण तसे नाही. दूरगामी परिणाम पण लक्षात घ्यावे लागतात.
कुछ पाने केलिए कुछ खोना तो पडताही है !
सगळं काही ठीक होईल.
कर नाही त्याला डर कशाला …
तिखट खाणं बंद पण करायचं नाहीये, आणि भरपूर पण खायचं नाहीये.
खायचं पण किती, त्याला पण मर्यादा असतात ना !
माझंच शेत आहे, मी हवं तेवढं खाईन, असं म्हणून मिरच्या खात बसलात, तर दूरगामी परिणाम कसे होतील ?
आपली क्षमता ओळखा.
पचनशक्ती ओळखा.
प्रतिकारशक्ती ओळखा.
भूतकाळाचा विचार करू नका.
भविष्याची चिंता करू नका.
वर्तमानात रहा.
दुसऱ्यावर विश्वास न टाकता, स्वतःला ओळखा, म्हणजे चुकीचे सल्ले ऐकले जाणार नाहीत.
पचेल एवढंच खा.
(मग अन्न असूदे, किंवा पैसा )
नाही पचलं तर, एकतर देह सोडावा लागतो नाहीतर देश तरी…..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
10.11.2016
Leave a Reply