मांसाहार करणारे प्राणी रक्ताला थंड ठेवण्यासाठी एक युक्ती करतात. जीभ बाहेर काढून ते श्वसनावाटे शरीरातील आर्द्रता वाढविण्यास मदत करतात. कुत्रा, वाघ, सिंह हे मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून जणुकाही शीतली, सीतकारी (हे पू. हठयोगी निकम गुरूजींनी शिकवल्याप्रमाणे प्राणायामाचे प्रकारच जणु) करत असतात.
मांसाहारी प्राण्यांच्या अंगाला घाम येत नसल्याने त्यांना शरीर थंड राखण्यास अशी जीभेने मदत करावी लागते. त्यामुळे हे प्राणी सतत आपले अंग चाटत असतात. अंग चाटत राहील्यामुळे जो ओलेपणा मिळतो, ती जणुकाही त्यांची आंघोळच असते.
म्हणून त्याचा दुसरा परिणाम असा होतो की, अंगाला खूप ऊग्र दर्प असतो.
वाघ सिंहाच्या पिंजऱ्याच्या जवळपास गेलो तरी हा दुर्गंध लक्षात येतो. कुत्र्यांना कितीही डेली सोप लावा. वास काही जात नाही.
हे प्राणी स्वभावतःच क्रूर असतात. त्यांचे विचकणारे दात बघितले तरी भीती वाटते. बांधलेला कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला, त्याचे ते अक्राळविक्राळ रूप बघीतले तर काय हिंमत पुढे जायची ?
मांसाहारी प्राण्यांची पिल्ले जेव्हा जन्म घेतात, तेव्हा पहिले अकरा दिवस पर्यंत त्यांचे डोळे बंदच असतात. नंतर उघडतात. वाघ असो वा वाघाची मावशी. सिंह असो वा कुत्रा, नियम तोच. पहिले अकरा दिवस जन्मआंधळे !
या मंडळीकडे दया माया प्रेम वात्सल्य अगदी “न” के बराबर ! प्रचंड अहंकार रोम रोम मे समाया हुआ ! गरूड, सिंह यांनी शिकार केल्यावर लगेचच फोटोमधली पोझ आठवतेय का त्यांची ? त्यांच्या डोळ्यातले भाव वाचता आलेत कधी ?
प्रचंड मस्ती, गुर्मीत असल्याप्रमाणे ( आजुबाजुला कोणी नसले तरी ) मान उंचावून पहाताना,
“बघा, अखेर केली की नाही शिकार ! माझ्यासारखा शिकारी मीच ! ”
अशी त्यांची देहबोली दिसते. अपवाद असतील पण अगदी क्वचित. मांजराने उंदराला पकडल्यावर, त्याला खाण्यापूर्वी, मांजराच्या चेहेऱ्याकडे बघीतलंय कधी ? आता मुद्दाम लक्ष ठेवा.
हे मांसाहारी प्राणी एवढे क्रूर असतात की, आपला वंश पुढे वाढला पाहिजे, या नैसर्गिक नियमाचाही त्यांना विसर पडतो. आणि….आणि…..त्यांच्या मादीने नुकत्याच जन्म दिलेल्या, आपल्याच रक्तापासून तयार झालेल्या, कोवळ्या जीवांचीच शिकार करून, भविष्यात त्यांच्या कामविश्वात तयार होणारा, त्याच्याच ताकदीचा एक मोठ्ठा शत्रु, आधीच नष्ट करून टाकतात, खाऊन टाकतात. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी, पुढे निर्माण होणारे आपले हितशत्रु कायमचे संपवून टाकण्याची यांची कंसवृत्ती दिसते. यासाठी त्याच्यातील आईला, तिच्या पिल्लांना, फार जपावे लागते. कारण इथे शत्रु, अपनेवाले, अपनेही घरवाले होते है ! कितीही मांसाहारी असली तरी एक आई, “असं” कधीच करू शकत नाही.
बरं यांचे आणखी एक वैशिष्ट्य दिसते, यांना भूक लागली की, त्यांना शिकार करण्यासाठी दिसतात, ते फक्त शाकाहारी प्राणीच ! पोट भरतात, फक्त शाकाहारी प्राण्यांच्या जीवावरच ! निसर्गाचा नियमच आहे हा ! चुक काहीच नाही.
वाघ सिंह शिकार करतील, हरीण ससे आणि हत्तीचीच ! पण कोल्हे आणि लांडग्यांची नाही.
वरील सर्व नियम मांसाहारी प्राण्यांना लागू होतात की नाही, ते पुनः एकदा तपासून पहा.
या निसर्गदत्त देणग्या, या प्राण्यांना ईश्वराने दिलेल्या आहेत.
मी मांसाहारी आहे, हाच माझा धर्म, एवढंच शिकून तो इथे आलेला असतो. कोणत्याही धर्मग्रंथांचा अभ्यास तो नंतर करत बसत नाही.
जगण्यासाठी, ( आजच्या भाषेत, बाय डिफाॅल्ट प्रोग्रामने आलेले ) हेच ईश्वर निर्मित नियम पाळणे, ही त्यांची गरज आहे. यातील एक गुण जरी कमी पडला तरी त्यांचे जीवन संपूनच जाईल.
म्हणून परत परत म्हणावेसे वाटते,
ईश्वर महान आहे !
यु आर ग्रेट !!
तुस्सी ग्रेट हो !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
26.09.2016
Leave a Reply