नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ६६ – चवदार आहार -भाग २८

आपण आहारातील या चवी वेगवेगळ्या अभ्यासल्या. प्रत्यक्षात मात्र अगदी एकाच चवीचे पदार्थ आपण खात नाही. किंवा जे पदार्थ खातो, त्यात अनेक चवी एकत्र झालेल्या असतात. किंवा असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामधे एकापेक्षा जास्ती चवी चाखायला मिळतात, काही पदार्थांचे परिक्षण करून कोणत्या कोणत्या चवी त्यांच्यात चवी मिळतात, हे ऋषींनी अभ्यासून ठेवले आहे.

जसे लसूण. हिचे संस्कृत नाव रसोन असे आहे. म्हणजे एक रस ऊन म्हणजे कमी. आंबट रस सोडून बाकी सर्व चवी लसणीमधे असतात. म्हणून लसूण आंबट पदार्थाबरोबर घेतली तर सहा चवी एकत्रितरीत्या पोटात जातात. म्हणून ताकाच्या कढीत लसूण हवीच ! किंवा लसणीच्या चटणीत चिंच हवीच. तर तो पदार्थ पूर्ण होतो.

तसेच आवळ्याची मुख्य चव आंबट. इतर तुरट, गोड इ. चवी देखील कमी अधिक प्रमाणात आवळ्यात असतात. पण आवळ्यात खारट चव मात्र नसते. म्हणून मीठात मुरवलेला, मीठ लावून वाळवलेला, किंवा नुसता आवळा मीठाबरोबर का खातात, ते समजले ?

नित्यं सर्व रसाभ्यासः ! चरकाचार्यांनी सहाही चवींचा आहार असावा असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मग गोड खायचे नाही, आंबट चालत नाही, तिखट तर अजिबात नको असं नाकं मुरडत खाण्याची काही आवश्यकता नाही.

पहिलं खाल्लेलं पचवायला पुरेसा वेळ दिला तर, कोणताही पारंपारिक, आणि स्वतःला आवडणारा आहार, आपल्याला पचू शकतो. त्याचा उपद्रव न होता, शरीराचे आणि मनाचे उत्तम पोषण आणि प्रीणन होते.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर
गोड, आंबट खारट पदार्थ वात कमी करतात. आणि कफ वाढवतात.
कडू तिखट आणि तुरट चव वाताला वाढवतात आणि कफाला कमी करतात.
खारट आंबट तिखट चवी पित्ताला वाढवतात.
गोड कडू तुरट पित्ताला कमी करतात.

मन प्रसन्न करणारा, शरीर पुष्ट करणारा, एवढा चवदार आहार आपण एवढा बदलून टाकलाय, की या चवीष्ट बलीष्ट आहाराच्या अभावांमुळे नियमितपणे औषधे मात्र घ्यावी लागत आहेत.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
28.11.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..