नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहार भाग १३

सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी.
काय शाकाहार, काय मांसाहार
काय असेल ते खाऊन घ्या गपचुप.
शेवटी पोट भरण्याशी मतलब ना !

सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ?

हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची आहे. त्यासाठी सण साजरे करायचे आहेत, ते सुद्धा संस्कृतीमध्ये सांगितले आहेत तसे, बुद्धी वापरून.
सणांची रचना ही ऋतुनुसार केली आहे. मराठी महिन्यानुसार केली आहे.

आद्य शंकराचार्यांनी सर्वसामान्य माणसांना निरोगी जगणे सोपे व्हावे, यासाठी काही कर्मकांडे घालून दिली. या प्रत्येक कर्मकांडाचा थेट संबंध आरोग्याशी आहे. प्रत्येक हिंदु सणामधे काहीनाकाही गोडधोड केले जाते. सर्व पदार्थ शाकाहारीच असतात. अगदी क्वचित ते सुद्धा कुळानुसार, प्रदेशानुसार देवतेनुसार मांसाहाराचा नेवैद्य असेल,

प्रत्येक सण साजरे करण्यामध्ये जे आरोग्य दडलेले आहे, ते बुद्धीने शोधले को सापडते.

आता हेच पहा ना, आजच्या नरकचतुर्दशीला दिवसाची सुरवात करायची तीच सातीवण नावाच्या औषधी झाडाच्या सालीचा रस पिऊन.
चुकलं.
प्रत्येक झाड हे औषधीच असते. झाडाच्या मागे औषधी असे विशेषण लावण्याची पण आवश्यकता नाही. किंबहुना जगात जे म्हणून द्रव्य स्वरूपात आहे, ते सर्व माणसासाठी, शतायुषी होण्यासाठी, औषधीसाठी वापरता येऊ शकते.

तर आजच्या दिवशी या सातवीण वृक्षाच्या सालीला फार महत्व आहे. या वृक्षाला नमस्कार करून, दिवा लावून, प्रदक्षिणा घालून, प्रार्थना करून काही साल काढून, वाटून रस काढताना त्यामधे, सैंधव, जिरे, ओवा, मिरी, लिंबाचा रस घालून घ्यायचा प्रघात आहे. यामुळे दिवाळीचा फराळ अघळपघळ झाला तरी फार काळजी नसते. हा फराळ सहज पचून जातो. आज हा रस घ्यावाच !

“हे, ईश्वरी अंशाने आणि औषधी गुणाने युक्त असलेल्या वृक्षदेवते, आज तुझ्या औषधी गुणाचा आम्हा मनुष्याला फायदा व्हावा, यासाठी तुझ्या सालीचा काही भाग आम्ही निःस्वार्थ भावनेने, औषधी रूपात करणार आहोत, त्यासाठी तू तुझ्या सर्व औषधी गुणांनी युक्त होऊन आमच्यावर कृपा कर. औषधासाठी का होईना, तुझ्या अंगावर आम्हा वैद्यांना शस्त्र वापरावे लागत आहे, यासाठी तू आम्हाला क्षमा कर.”

केवढा अर्थ भरला आहे या प्रार्थनेत !
प्रार्थनेत शक्ती असते.
जशी प्रार्थना असते, तसे फळ मिळते.
प्रार्थना जेवढी भावपूर्ण होते, तेवढा गुण जास्त येतो.

अखिल मानवाच्या कल्याणासाठी, कोणत्याही अपेक्षांशिवाय, आपल्या औषधी अंगाचा वापर मुक्तपणे करू देणाऱ्या या वृक्षदेवतांप्रती, या निमित्ताने शतशः नमन !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
29.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..