नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ७

जेवणे म्हणजे शरीराला फक्त कॅलरीज पुरवणे नव्हे. तसं असतं तर शरीराची रोजची गरज किती आहे ती पाहून तेवढीच एक कॅपसुल घेऊन पुरते का ? किंवा एका डब्ब्यातील ड्रींक्समधे भरून ते तेवढेच प्याले तर ?

असं चालत नाही किंवा पुरत नाही.
जेवण्यातून समाधान मिळत असते.
अहो, अगदी घरच्या डब्यातील भाजी पोळी आमटीभात ऑफीसमधे खायचा असेल तर त्याच डब्यात बुचकुन बुचकुन खाणे आणि तोच डबा छान ताटात वाढून घेऊन खाणे यात कॅलरीज तेवढ्याच मिळतील, पण आनंद! समाधान !!

ते या एका कॅपसुल किंवा टीनपाट हेल्थड्रिंकच्या पत्र्याच्या डब्ब्यातून कसे मिळणार ?

मनाच्या प्रन्नतेवरच पचन देखील अवलंबून असते. मन हे अन्नापासूनच बनते, असंही उपनिषदामधे सांगितले आहे.
आता उपनिषदे भारतीय आहेत, म्हणजे फक्त थापेबाजीच असणार, असं विधान कोणी केल्यावर त्यांना कसं पटवणार ना ? जाऊंदे.

पाश्चात्य संस्कृतीला आत्ता आत्ता मनाचे अस्तित्व समजायला लागलंय. मन मानायला हवं, त्याचा अभ्यास करायला हवा, असं ते खुल्या दिलानं मान्य करताहेत. हा त्यांचा मोठेपणा नक्कीच आहे.

मन दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व असतं. यावर आता संशोधन करायला त्यांनी सुरवात केली आहे. जे दिसत नसतं, ते नसतं, असं नसतं. हे आत्ता त्यांना पटायला लागलंय. पण आमच्याकडच्या अंनिस सारख्यांना हे कळायला अजून काही वर्षे जातील. सुदैव आहे पाश्चात्य देशात अंनिसची शाखा नाही. असो.

आयुर्वेद म्हणतो, मन ह्रदयात आहे. पण शोधले जाते आहे मेंदूत. कसे मिळेल ? जिथे हरवले आहे, जिथून हरवले आहे, तिथेच जाऊन शोधले तरच मिळेल.

आरोग्याचेही तसेच आहे. जिथून आपले आरोग्य हरवायला सुरवात झाली आहे, तिथपर्यंत जाऊन पोचायचा, हा एक छोटासा भारतीय प्रयत्न आहे.

हो. भारतीय आरोग्य वेगळं आहे. ते शोधण्यासाठी तशी दृष्टी आवश्यक आहे.
ईश्वर बघण्यासाठी डोळे पण तसेच असावे लागतात. आणि पात्रता पण !

श्रीकृष्णांच्या विराट रूपाचे दर्शन घेण्यासाठी, अर्जुनाला पण, वेगळी दृष्टी देणं भगवंताना भाग पडलं.
भारतीय आरोग्य अभ्यासण्यासाठी अशी दृष्टी हवी तरच आरोग्यात होत गेलेले फरक लक्षात येतील.
बघा पटलं तर….

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
22.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..